लोहा – प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली होती, यावेळी पोलिसांच्या वतीने मराठा समाजावर लाठी हल्ला केला गेला ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंकित करणारी असून या लाठी हल्ल्याचा मी जाहीर निषेध करत असल्याचे शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी लोहा येथे मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगितले.
सोमवार दिनांक 18 सप्टें रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सकल मराठा समाज मराठा आरक्षण उपोषणास शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्ते सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी भेट दिली, यावेळी आशाताई शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले,
यावेळी शेकापच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठा आरक्षण उपोषणास जाहीर पाठिंबाचे पत्र लोहा येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा आशा ताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले ,यावेळी उपोषणकर्त्यांशी संवाद साधताना आशाताई शिंदे म्हणाल्या की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज पाटील जरांगे व नांदेड जिल्ह्यातील दत्ता पाटील हडसणीकर यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व मराठा आरक्षण उपोषणकर्ते व मराठा आरक्षण आंदोलनाला व सकल मराठा समाजाच्या मराठा आरक्षण आंदोलनाला व मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी व सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शेतकरी कामगार पक्ष व मी सदैव मराठा समाजाच्या सोबत भक्कमपणे सोबत असल्याचे यावेळी आशाताईं शिंदे यांनी लोहा येथील सकल मराठा आरक्षण उपोषण कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले,
यावेळी खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल, संचालक सुधाकर सातपुते, सिद्धू वडजे, दिगंबर डिकळे, आनंद देशमुख लोंढेसांगवीकर सह शेकाप कार्यकर्ते, पदाधिकारी व बहूसंख्येने उपस्थित होते.