बीटस्तरीय बैठकीत गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी घेतला उस्माननगर व बारुळ अंतर्गत शाळांचा शैक्षणिक आढावा

कंधार ; प्रतिनिधी

      बीट-उस्माननगर व बारुळ अंतर्गत संकुल उस्माननगर,शिराढोण,,
कौठा,बारुळ व मंगलसांगवी येथील सर्व मुख्याध्यापक(जि.प. व खाजगी शाळा) यांची आढावा बैठक – दि.20.09.2023 भीमाशंकर विद्यालय शिराढोण येथे पार पडली अध्यक्ष म्हणून श्री.खुशाल पाटील पांडागळे मु.अ.हे होते ,
           श्री.बालाजी शिंदे गटशिक्षणाधिकारी पं.स.कंधार यांनी आधार अपडेट, व्हँलिड संख्या, अन प्रोसेस, आधार नसलेले वि.संख्या,
अध्ययनस्तर निश्चिती अहवाल,
गणवेश वाटप अहवाल,
नव साक्षर भारत सर्वेक्षण अहवाल,
शाळांना राज्य स्तर,जिल्हा स्तर पुरवठा साहित्य अहवाल,शिक्षक सिव्हिल लिस्ट,शापोआ DBT रक्कम वाटप अहवाल,यावर सखोल असे मार्गदर्शन केले व शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला .

  तर श्री.वसंत मेटकर शि.वि.अ.यांनी शिष्यवृत्ती परीक्षा,पायाभूत चाचणी अहवाल,
PGI indicator साठी Udise+ वर भरलेली माहिती तपासणी,पी.एम.पोषक शक्ती निर्माण योजना माहिती देऊन लिंक वर माहिती भरण्यासाठी सूचना केल्या तसेच इतर अनेक विषयावर माहिती देण्यात आली.

बैठकीस केंद्रप्रमुख जयवंत काळे,व्यंकट ढोणे,दिनकर,गणेश थोटे उपस्थित होते शेवटी आभार कें.प्र. श्री.एन.एम.वाघमारे यांनी मांडले,बीटस्तरीय बैठकीसाठी रामदास पांडागळे,शिवहार पांडागळे व राम करंडे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *