तरुण पिढी आणि व्यसनाधीनता..

आपल्यापुढे आ वाचुन असलेली समस्या ..
व्रत वैकल्य ,उपवास तापास , देव , पुजा अर्चा ,यांना बाजूला करुन किवा चांगल्या गोष्टी वाचणे किवा ऐकणे नाही आईवडील किवा नात्यात संवाद नसणं आणि सोशल मिडीया , अमाप पैसा , आजूबाजूला पहात असलेल्या गोष्टी आणि संगत
अध्यात्म ,, शास्त्र यांचा अभ्यास नसणं असेल अशा अनेक गोष्टीनी तरुण पिढी व्यसनाकडे वळलेली दिसते..
हरीतालिका व्रत याचा संदर्भ घेउन मी हा लेख लिहीणार आहे.. हे व्रत कुमारीकेला गुरुजीकडुन पुजा सांगुन दिले जाते .. ते गुरुजी सुध्दा संपूर्ण ज्ञान असलेले असायला हवेत.. हे व्रत पार्वतीने शंकराना प्रसन्न करायला कंदमुळे खाऊन केलं होतं.. यासाठी आई आजीला याबद्दल माहीती हवी तरच ती मुलीला सांगु शकते आणि योग्य माहीती कुठुन मिळेल तर शास्त्रातुन म्हणजेच वाचन किवा श्रवण यातुन..
आता मुली कामानिमित्त किवा शिक्षणासाठी बाहेर असतात त्यामुळे दिवसभर त्यांना उपवास करायला जमणार नाही पण त्या व्रतामागे भावना काय असावी हे तर ती जाणुन घेउ शकते.. चातुर्मास का पाळायचा यामागे शास्त्र असल्याने मुलांना ते पटु शकतं पण त्यासाठी घरी याचा अभ्यास हवा.. म्हणुन एकत्र कुटुंब पध्दतीचा खुप उपयोग होतो.. हरितालिकेच्या दिवशी घरी बायको उपवास करते का तर मिळालेला नवरा चांगला रहावा आणि नवरा काय करतो तर बार मधे बसुन दारु आणि सिगरेट पितो ..हेच मुलं पहातात आणि वयात आले की तेही तसच वागतात.. त्याच दिवशी मुलगी मुलांसोबत बार मधे जाते आणि स्टाईल मधे सिगरेट आणि बिअर पिते याचं कारण घरापासून बाहेर गावी रहाणं आणि चुकीची संगत.. अशा वेळी पालकानी काय करावं ??.. खुप मोठा विषय आहे आपण मुलांच्या मागे फिरु शकत नाही पण आपण आपले वागणे बोलणे सुधारु शकतो .. मुलं त्याचच अनुकरण करतात .. मुलांना वाचनाची सवय लावायला आपण वाचायला हवं.. प्रत्येक घरात भगवदगीता असायला हवी.. त्याचं वाचन व्हायला हवं.. भगवंत आणि देव यातला फरक कळायला हवा.. कर्म म्हणजे नक्की काय याचा अभ्यास व्हायला हवा.. माझी मुलगी सुध्दा मुंबईत असते.. तिला मी भगवद्गीता दिली आहे.. फोन झाला की मी तिला विचारते किती वाचलीस.. काय वाटतय वाचुन ??.. तिला काही प्रश्न पडतात त्याची उत्तरे द्यायला ते मला माहीत असणं गरजेचे आहे त्यामुळे माझं वाचन होतं ,माझा अभ्यास होतो.. मीही तिच्यासोबत २४ तास राहु शकत नाही पण इथे राहुन तिच्या मनावर हे सतत विंबवु शकते.. जे आपल्याला जमेल ते आपण करायचय पण त्यासाठी पालकानी आधी व्यसनांपासुन दुर राहायला शिकलं पाहिजे.. त्यामुळे तरूण पिढीला नाव ठेवण्याआधी आपण काय करतो हे पहाणं गरजेचे आहे..
संध्याकाळी ज्यांना शक्य आहे त्यांनी लवकर डिनर करणं असेल रात्री लवकर झोपुन सकाळी लवकर उठून व्यायाम करणं असेल या गोष्टीवर काम करायला हवं .. झोपताना काहीतरी वाचुन झोपणं अशा चांगल्या सवयी आपण अंगिकारायला हव्यात.. शाकाहारी रहाणं असेल अशा अनेक गोष्टीनी आपण व्यसनापासुन दुर राहु शकतो..
कालच मी अक्षय कुमार चा व्हीडीओ पाहिला .. तो सांगत होता तो रोज रात्री ९ ३० ला झोपतो आणि पहाटे चार वाजता व्यायामाला उठतो .. तो कधीही पार्टीजना जात नाही . या त्याच्या किवा अनेक लोकांच्या चांगल्या सवयी आपण घेत नाही .. आणि कोणाकडूनही वाईट गोष्टी मात्र कशा पटकन घेतल्या जातात…आताच जागे व्हा.. अजुन वेळ गेलेली नाही..
जगात खुप चांगली मंडळी आहेत त्यांना फॉलो करा…
चांगले वाचा.. चांगले ऐका.. एका क्षणात काही गोष्टीचा आपल्याला त्याग करता यायला हवा आणि ही ताकद अध्यात्माने येवु शकते..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *