मुखेड -ग्रामीण ( कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय,वसंतनगर ता.मुखेड जि.नांदेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आजादी का अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त आ.डॉ.तुषारजी राठोड साहेब यांच्या हस्ते अमृत कलशात मेरी माटी मेरा देश अंतर्गत मिट्टी टाकुन मातृभूमीला नमन करण्यात आले.
सोबतच संस्थेचे सहसचिव गोवर्धन पवार, संस्थेचे सदस्य मुख्या.गोविंद पवार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड, उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे, माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे, प्रसिद्धी विभागाचे प्रमुख डॉ.रामकृष्ण बदने, नॅकचे समन्वयक प्रा.डॉ. उमाकांत पदमवार,आय.क्यू.ए.सी.चे समन्यक प्रा.बी.सी. राठोड, स्टाफ सेक्रेटरी प्रा.डॉ.नागोरावआवडे,रा.से.यो.कार्यक्रमधिकारी प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले,प्रा.डाॅ. निवृत्ती नाईक, कार्यालय अधीक्षक श्री रमेश गोकुळे, महाविद्यालयातील सर्व सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेवीका सर्वांच्या वतीने मूठभर माती हातात घेऊन मातृभूमीचे स्मरण करून कलशा मध्ये टाकण्यात आली.
२९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथे हा अमृत कलश पाठवण्यात येणार आहे.