मुखेड ; प्रतिनिधी
मुखेड येथे उपस्थित विद्यार्थी व शिक्षक हे अजंठा व वेरूळच्या लेण्यासारखे अर्थपूर्ण आहेत.राठोड बंधूनी या माळरानावर जंगल मे मंगल करण्याचे काम केले आहे.
प्रेमचंद यांच्या साहित्याने बाबासाहेबां पूर्वी दलित समस्यांना आपल्या साहित्यातून न्याय देण्याचे कार्य केले.प्रेमचंद यांच्या साहित्यातून तत्कालीन समाजाच्या सर्वच प्रश्नांची जाणीव होते. एवढेच नाही तर आज सुद्धा त्यांचे साहित्य प्रासंगिक आहे.भाषा माणसाच्या चारित्र्याचा विकास करते.भाषेतूनच संस्कृती संक्रमण होत असते.प्रत्येक हिंदी भाषेवर प्रेम करणारा व्यक्ती अन्य भाषांचा देखील तितकाच सन्मान करतो. प्रेमचंदावर आर्य समाज, महात्मा गांधी व शेवटी मार्क्सचा प्रभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांनी साहित्य वाचनातून जुन्या वाटांचा धांडोळा घेत नव्या वाटा शोधल्या पाहिजेत.पुर्वी इतिहास एकांगी लिहिला गेला पण आधुनिक काळात सर्वांगाने लिहिला जातो आहे. ज्यात दलित, तृतीयपंथी व स्त्रियां यांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली नव्हती ती फोडली जात आहे.एकेकाळी गावात मानवता होती.अर्थव्यवस्थेत वस्तूविनीमयाला महत्व होते.आता सर्वत्र बाजारवाद आला आहे.केवळ नफा हा डोळ्यासमोर ठेवून काम चालू आहे.प्रत्येक साहित्यातला मानवतावाद आपण समजून घेतला पाहिजे.हिंदी भाषेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.एवढेच नाही तर भारतातील प्रत्येक माणूस जोडण्याचे काम हिंदी भाषेने केले असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील सेवानिवृत्त हिंदी विभागाध्यक्ष प्रा.डाॅ.गणेशराज सोनाळे यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड येथे हिंदी विभागाद्वारे आयोजित हिंदी दिवस व हिंदी वाड्मय मंडल उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ.गुरुनाथ कल्याण यांनी करुन कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.बदने आर.डी.यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी वाड्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.या मंडळात पवार अनिल (अध्यक्ष)कु.गुंडावार मानसी (उपाध्यक्ष),चव्हाण सूनिल (सचिव)कांबळे रवि (सदस्य),शिरसे अमित,कु.केंद्रे तेजस्विनी, राठोड नंदकुमार, डोईफोडे धनराज,कु.गायकवाड किर्ती,राठोड रोहिदास,डोंगळे मल्लिकार्जुन हे आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारतातील प्रत्येक माणूस जोडण्याचे काम हिंदी भाषेने केले -प्रा.डाॅ.गणेशराज सोनाळे
मुखेड -येथे उपस्थित विद्यार्थी व शिक्षक हे अजंठा व वेरूळच्या लेण्यासारखे अर्थपूर्ण आहेत.राठोड बंधूनी या माळरानावर जंगल मे मंगल करण्याचे काम केले आहे. प्रेमचंद यांच्या साहित्याने बाबासाहेबां पूर्वी दलित समस्यांना आपल्या साहित्यातून न्याय देण्याचे कार्य केले.प्रेमचंद यांच्या साहित्यातून तत्कालीन समाजाच्या सर्वच प्रश्नांची जाणीव होते. एवढेच नाही तर आज सुद्धा त्यांचे साहित्य प्रासंगिक आहे.भाषा माणसाच्या चारित्र्याचा विकास करते.भाषेतूनच संस्कृती संक्रमण होत असते.प्रत्येक हिंदी भाषेवर प्रेम करणारा व्यक्ती अन्य भाषांचा देखील तितकाच सन्मान करतो. प्रेमचंदावर आर्य समाज, महात्मा गांधी व शेवटी मार्क्सचा प्रभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांनी साहित्य वाचनातून जुन्या वाटांचा धांडोळा घेत नव्या वाटा शोधल्या पाहिजेत.पुर्वी इतिहास एकांगी लिहिला गेला पण आधुनिक काळात सर्वांगाने लिहिला जातो आहे. ज्यात दलित, तृतीयपंथी व स्त्रियां यांच्या प्रश्नांना वाचा फोडली गेली नव्हती ती फोडली जात आहे.एकेकाळी गावात मानवता होती.अर्थव्यवस्थेत वस्तूविनीमयाला महत्व होते.आता सर्वत्र बाजारवाद आला आहे.केवळ नफा हा डोळ्यासमोर ठेवून काम चालू आहे.प्रत्येक साहित्यातला मानवतावाद आपण समजून घेतला पाहिजे.हिंदी भाषेने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.एवढेच नाही तर भारतातील प्रत्येक माणूस जोडण्याचे काम हिंदी भाषेने केले असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील सेवानिवृत्त हिंदी विभागाध्यक्ष प्रा.डाॅ.गणेशराज सोनाळे यांनी ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड येथे हिंदी विभागाद्वारे आयोजित हिंदी दिवस व हिंदी वाड्मय मंडल उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुण कुमार थोरवे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ.गुरुनाथ कल्याण यांनी करुन कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.बदने आर.डी.यांनी मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी वाड्मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.या मंडळात पवार अनिल (अध्यक्ष)कु.गुंडावार मानसी (उपाध्यक्ष),चव्हाण सूनिल (सचिव)कांबळे रवि (सदस्य),शिरसे अमित,कु.केंद्रे तेजस्विनी, राठोड नंदकुमार, डोईफोडे धनराज,कु.गायकवाड किर्ती,राठोड रोहिदास,डोंगळे मल्लिकार्जुन हे आहेत.
या कार्यक्रमासाठी स्टाफ सेक्रेटरी प्रा.डाॅ.नागोराव आवडे, सहस्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.अरूणा ईटकापल्ले,नॅक समन्वयक प्रा.डॉ.उमाकांत पदमवार,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डाॅ.नाईक एन.यू.,प्रा.सूभाष कनकुटे,प्रा.डाॅ.संजीव रेड्डी,प्रा.डाॅ.देविदास केंद्रे,प्रा.डाॅ.शंकरय्या कळिमठ,प्रा.डाॅ.पंडित शिंदे,प्रा.डाॅ.कविता लोहाळे,प्रा.डाॅ.वसंत नाईक,प्रा.एस.बाबाराव,प्रा.डाॅ.शिल्पा शेंडगे,प्रा.डाॅ.सखाराम गोरे,प्रा.प्रदिप कोटुरवार,प्रा.डाॅ.सूभाष देठे,प्रा.सूनिल पवार,प्रा.डाॅ.महेंद्र होनवडजकर,प्रा.अंगद जाधव,प्रा.बालाजी राठोड,प्रा.केंद्रे हे प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.