कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगर परिषदेचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजी मंडई आहे. या भाजीमंडई मध्ये तालुक्यातील शेतकरी बांधव आपल्या शेतातील शेतमाल घेऊन विक्रीसाठी येत असतात. त्याठिकाणी जवळपास स्वच्छतागृह नसल्यामुळे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजी मंडई गाळा नंबर 6 हा अक्षरशः शौचालया सारखा वापरल्या जात आहे.
नगरपरिषदेने याकडेविशेष लक्ष देऊन तेथील उघड्या वरील स्वच्छता त्वरीत करण्यात यावी व त्या ठिकाणी नवीन सेटर लावून तेथील परिसराची दररोज स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी कंधार तालुक्याच्या वतीने करण्यात आले .
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भाजी मंडई, भारतीय स्टेट बँक जवळ आहे व तो ठिकाण अतिशय रहदारीचा आहे. त्या ठिकाणी नव्याने शौचालय करण्यात यावे.
वरील विषय कंधार नगरपरिषदेने गांभीर्यपूर्वक दाखल नाही घेतल्यास आम आदमी पार्टी कंधार तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे .
या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड ,तहसीलदार तहसील कार्यालयय, कंधार यांना दिले .
या निवेदनावर साईनाथ मळगे आप तालुका अध्यक्ष, तिरुपती इंगळे तालुका उपाध्यक्ष, नितीन भोसीकर तालुका सचिव, सरोज मोरे तालुका प्रसिद्धीप्रमुख आदीची स्वाक्षरी आहे .