आपल्याकडे बऱ्याच व्यक्तीची मानसिकता अशी असते.. लैगिकतेवर बोलायला सुरुवात करा ते तासनतास ऐकतील पण अध्यात्मावर काही सांगायला जा त्यांना पटत नाही .. खरं तर शास्त्र जाणुन घेतलं तर त्यात शाश्वत सुख आहे.. दुख अजिबात नाही कारण ते कनेक्षन भगवंत आणि आपल्यामधे असते..
आणि लैगिकतेत सुख आहे तितकेच दुखही आहे कारण शास्त्रानुसार मुलांना जन्म देण्यासाठी फक्त आपण आपल्या इंद्रीयांचा उपयोग करायचा असतो इतर वेळी आपण अध्यात्मात राहुन आपण इंद्रीयांवर ताबा मिळवायचा असतो..
प्राणी पक्षी तेच करतात.. तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येइल आणि शास्त्र जाणून घेतलं आनंदीही राहु.. याच अनुषंगाने दोन वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांचे प्रश्न आहेत .
सत्तरीतील सद्गृहस्थ विचारतात ,,मला सेक्स करायचा आहे पण माझं लिंग ताठरत नाही मी काय करु ?? .. त्यांच्या प्रश्नातच त्यान्चं उत्तर आहे .. आयुष्यभर त्यांनी तेच केलय मग आता तरी तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवुन भगवंताच्या सेवेत रहा.. तुमचे अवयव साथ देत नाहीत याचाच अर्थ हा विषय संपलाय आणि शरीराला याची गरज नाही मग हा अट्टाहास कशाला ??.. त्या त्या वयात योग्य त्या गोष्टी कराव्यात नाहीतर त्याचा त्रास होतो..मी लैगिकतेवर देत असलेलं नॉलेज घेउन त्यांनी त्यांच्या मुलांना नातवंडाना ते ज्ञान द्यावं..मुलांशी यावर मोकळेपणाने चर्चा करावी..
दुसरा प्रश्न होता १६ वर्षाच्या मुलाचा.. मला सेक्स करायचाय कसा करु ??.. आता त्याने वाचन ,अभ्यास , खेळ , करीअर यावर फोकस करावं आणि लैगिकतेवर नंतर जाणुन घ्यावं.. आयुष्यभर हेच करायचय .. थोडं घरच्यानीही अशा वयात येणाऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं.. तरुण मुलानीही भगव्दगीता वाचायला सुरुवात करा.. आचार विचारात खुप फरक पडेल.. आयुष्य खुप सुंदर आहे.. शास्त्र तर त्याहूनही सुंदर आहे आणि लैगिकता तर उत्तम आहे पण हे सगळं जाणुन घेतलं , समजुन घेतलं , त्याचा अभ्यास केला तर..
प्रत्येकात सौंदर्य आहे.. फक्त गरज आहे आपली विचारसरणी बदलायची.. आपण फक्त आपल्याला बदलायचं आहे आणि आनंदी रहायचं आहे..
लैगिकता आणि अध्यात्म याची जो सांगड घालेल तो सुखी होइल.. सोच बदलो..
सोनल गोडबोले..