हृदयाचा वापर करा आणि ह्रदय जाणून घ्या.. आरोग्य -डॉ गौरव दिलीप पुंडे

*हृदयाचा वापर करा आणि ह्रदय जाणून घ्या…*
*_Use Heart – Know Heart_*

डॉ गौरव दिलीप पुंडे
MBBS,MD(Med),DrNB Cardiology
कन्सल्टंट इंटरवेंशनल कार्डिओलॉजिस्ट
(हृदयरोग तज्ज्ञ)
ग्लोबल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, व्हीआयपी रोड नांदेड
संपर्क – +९१ ९१३००४३०००

 

लोकांमध्ये जनजागृतीसाठी व हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी जागतिक हृदय दिन दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. यासाठी प्रत्येकाने स्वतःची व आपल्या प्रियजनांची चांगली काळजी घेणे तसेच हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाला निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे पालन करण्यास प्रोत्साहित करते. या अभियानाद्वारे *Teach One – Each one* या संकल्पनेतून प्रत्येक व्यक्तीत ह्रदय आरोग्याविषयी जागरुकता निर्माण केल्यास निश्चितच ह्रदयरोगाचा धोका कमी होईल.
*वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या* मते, हृदयरोगामुळे जगात दरवर्षी अंदाजे १७.७ दशलक्ष मृत्यू होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गेल्या दोन दशकांमध्ये हृदयरोगामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाल्यामुळे हा आजार खूप घातक असल्याचे अधोरेखित झाले आहे. WHO ने जारी केलेल्या अहवालात 2000 ते 2019 या 20 वर्षांच्या कालावधीत विविध आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. जगभरात मृत्यूला कारणीभूत ठरणार्‍या दहा आजारांपैकी सात असंसर्गजन्य आजार आहेत. या यादीवर नजर टाकल्यास हृदयरोग किंवा हृदयविकार पहिल्या स्थानी असल्याचे दिसून येते.
भारतीय अहवालानुसार हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण २०२० पर्यंत ४.७ दशलक्ष प्रतिवर्ष असून ते वेगाने वाढत आहे. सध्या हृदयविकाराच्या झटक्याला वयाची अट राहिली नाही. अगदी कमी वयातही हार्ट अटॅक येत आहे. कोरोना नंतर तर हृदयरोगाचे प्रमाण अधिक वाढलेले दिसून येते. जणु काही ह्रदय रोगाची लाटच आली आहे. निसर्गतः भारतीयांना पाश्चिमात्य लोकांपेक्षा ह्रदयरोगाचा धोका अधिक संभवतो; कारण भारतीयांच्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांचा आकार हा लहान आहे. लोकसंख्येचा विस्फोट अन् त्यातून निर्माण झालेली स्पर्धा व ताणतणाव यामुळे भारतीयांमध्ये ह्रदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

*हृदयविकाराचा झटका काय असतो ?*
आपल्या हृदयाचा रक्त पुरवठा तीन बाजूंनी होतो. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. 40% पर्यंत अडथळा जास्त समस्या निर्माण करत नाही. जेव्हा हा अडथळा 70%पेक्षा जास्त वाढतो तेव्हा हृदयातील रक्त प्रवाह मंद अथवा बंद होतो आणि रूग्णास हृदयविकाराचा झटका येतो.

*हृदयविकाराची कारणे*
1. मधुमेह
2. उच्च रक्तदाब
3. लठ्ठपणा
4. अनियमित आहार व व्यायाम
5. व्यसनाधिनता
6. तणावपूर्ण जीवनशैली
7. अनुवंशिकता
8. वाढलेली रक्तातील कोलेस्ट्रॉल (चरबी) पातळी
9. बैठी जीवनशैली
10. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या पदार्थांचा अधिक वापर (fast food)

*हृदयरोगाची लक्षणे*
1. छातीत दुखणे, जळजळ होणे
2. छातीत आवळणे / जड वाटणे
3. पाठदुखी / खांदे दुखी / हात दुखणे
4. अस्वस्थता, छातीत धडधड होणे
5. धाप लागणे, घाम येणे
6. मानेत त्रास होणे, जबडा दुखणे, घसा, पोटामध्ये किंवा मागे बाजूला दुखणे
7. चक्कर येणे, उलटी किंवा मळमळ,अशक्त वाटणे
8. पाय किंवा गुडघे यावर सूज येणे, थकवा येणे

*हृदयरोग निदान व उपचार*
हृदयरोग निदान करण्यासाठी हृदयरोग तज्ज्ञ खालील तपासणी करतात
1. इ सी जी
2. 2D इको
3. ट्रेडमिल टेस्ट
4. कोरोनरी अँजिओग्राफी
5. रक्तातील हृदयविकारासंबंधी चाचण्या उदा. – HsTROP I
6. २४ तास होल्टर study

हृदयविकाराच्या झटक्याचे निदान झाल्यानंतर कोरोनरी अँजिओप्लास्टी ह्या ह्रदयरोगावरील उपचार पद्घतीद्वारे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या बंद रक्तवाहिन्या (कोरोनरी आर्टरीज) स्टेंटद्वारे उघडल्या जातात व रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत केला जातो. ह्यामुळे रूग्णाच्या जीवितास होणारा संभाव्य धोका टळतो. ही एक जीवनदायी उपचार पद्धती आहे. गरज पडल्यास बायपास सर्जरी करण्यात येते.

*हृदयरोग प्रतिबंध*
१) नियमित व्यायाम – दररोज अर्धा तास चालणे (उदाहरणार्थ- फ़ास्ट चालणे, जॉगिंग,साइक्लिंग, पोहणे )
वजनावर व्यायामाने नियंत्रण आले म्हणजेच आजारांवरही नियंत्रण येते.
२) धूम्रपान वर्ज करणे – अति धुम्रपानामुळे अचानक होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ( Sudden Cardiac Death)
३) दारूचे व्यसन टाळणे
४ ) निरोगी आहार- संतुलित निरोगी आहार असावा. जेवणाचे ताट हे विविध पदार्थानी युक्त (रंगीबेरंगी) असावे.
आहारामध्ये मिठाचे प्रमाण (१.५ ग्रॅम / दिवस) नियंत्रित असावे. हिरव्या पालेभाज्या व फळांचा समावेश असावा.
५) जीवनशैलीत बदल –
ताणतणाव (*STRESS*) या शब्दातच त्याचे व्यवस्थापन दडले आहे.
* *S*-Strength – व्यायाम + ध्यानधारणा
* *T*-Time management वेळेचे व्यवस्थापन
* *R*-Relations नातेसंबंध आप्तेष्ट, मित्र आणि इतर नाती जपणे.
* *E*- Easy going-नात्यांतील सहजता
* *S*-Saving,Insurance, आर्थिक बचत, विमा
* *S*-Spirituality – अध्यात्मिकता

५) *आरोग्याची KYC* ( Know Your Counts)
तुमचं वजन, रक्तदाब, शुगर, BMI आणि कोलेस्ट्रॉल याची माहिती असणे व नियमित तपासणी करणे.
६) डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत खाव्यात व त्या स्वतःहून बंद करू नयेत.

*Key Massege – मूलमंत्र*
निरामय जीवनशैलीची ABCD …
* A – Anxity – ताणतणाव व्यवस्थापन
* B – Bottle – मद्यपानावर नियंत्रण /प्रतिबंध
* C – Cigarettes – धुम्रपानावर प्रतिबंध
* D – Diet – योग्य आहार
* E – Exercise – योग्य प्रकारचा व्यायाम
* F – Friends – मित्र असावेत. तणाव नियंत्रणास मदत होते.
* G – Guru – आयुष्यास योग्य दिशा मिळण्यास गुरूची/पालकांची आवश्यकता असते.
* H – Humor – विनोद आयुष्य आनंदी करते.
* I – Insurance – health insurance. आरोग्य विमा, संकट काळी मदत होते.
* J – Joy – आनंद
*दवा में कोई खुशी नही*
*और खुशी जैसी कोई दवा नही*
* K – Knowledge – ज्ञानी असणे
* L – Legitimate – कायद्याचे पालन करणे.
इत्यादी…

जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने विविध चर्चा, मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा, स्टेज शो सारख्या कार्यक्रमांचे जनजागृतीसाठी जगभर आयोजन केले जाते त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणे आवश्यक आहे.
या वर्षीचे घोषवाक्य *”Use Heart, Know Heart”* हे आहे. त्यामुळे सर्वांनी आपले हृदय जाणून घेणे आवश्यक आहे.
जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने त्याचे महत्त्व समजून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या हृदयाच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तुम्हाला हृदयरोगाची लक्षणे जाणवल्यास त्वरीत तज्ञांशी संपर्क करावा.
*आहार, विहार, व्यवहार आणि मनःशांती हीच शतायुषी होण्याची चतुःसुत्री होय.*

धन्यवाद…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *