मन्याड खोर्‍यातील रानमेवा सीताफळाचे बोलके आत्मकथन.लेखन-गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी

कंधार तालूक्यात अप्पर मानार प्रकल्प म्हणजे तुकाईच्या माळाला असलेले लिंबोटीचे छ.शिवाजी धरण व लोअर मानार म्हणजे वरवंट (बारुळ)चे मराठवाड्यातील सर्वात मोठे मातीचे लोअर मानार धरण आणि राष्ट्रकूट कालिन जगतूंग सागर या तिन्हीही पाणी स्तोत्रावर तालूक्यात सिंचनाच्या क्षेत्राची तहान भागवते.पण जास्तीचा भाग हा डोंगराळ भागाने वेढलेला आहे.या तालूक्यात भिजवनी क्षेत्र असो का कोरडवाहू डोंगराळ भाग या दोन्हीही ठिकाण मी या भागातील रानमेवा म्हणून सुपरीचित आहे.जुलै-ऑगस्ट या पावसाळी महिन्यात मी जन्माला येवून बाळसे धरु लागतो,सप्टेंबरच्या मासात मुग अन् उडीद वाळवण करणाऱ्या अगदी गर्मिच्या दिवसात म्हणजे सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात वातावरण गडगुड आणि थंडीची चाहूल लागताच मी घुलायला आरंभ होतो.वातावरणात गर्मी असल्याने मी पाड होवून पिकायला लागतो.हातावर पोट असणाऱ्यांना माझ्यामूळे हातात दाम येण्याचे साधन बनतो.म्हणतात ना “कोकणात नारळं”तसे मन्याड खोर्‍यात सीताफळ पण तालूक्यातील महसूल विभाग “गौण खनिजावर पाळत ठेवते.” माझी निर्यात होतांना धृतराष्ट्राची भुमिका चोख बजावते.मी पिकलेला असो वा नसो मला तोडून ल्हारीच्या ल्हारी भरुन मन्याड खोर्‍यातून इतरत्र निर्यात करण्यासाठी पैसे कमविण्यास नगर-महानगरात मला नेवून भरमसाठ रुपये कमवण्याच्या उद्देशाने विकते.अन् मला लेकरासम जपणाऱ्या वाडी-तांड्यावरील पालकांचे हातावर पोट असणाऱ्या मला विकून पोट भरणाऱ्या खेडो-पाडी,वाडी-तांडा वस्तीवरील माझ्या पालकांना डालीने विकून उदरनिर्वाह करणे जमत असे!पण माझ्या वृक्षांचा पाला ओरबाडून ल्हारीत टाकतात अना त्यावर मला डोळे उघडो न उघडो हिरवा रंग पिवळसर होण्याआधीच कोंबून नेतांना माझ्या वृक्षांच्या अजुबाजुला असणारे पाषाण ह्रदयी दगड-गोटाळांना दु:ख आणावर होते.पण त्यावर निर्बंध कोणी लावत नसल्याने माझी हेळसांड होते.माझ्या वाणावर संशोधन करण्यासाठी एक शासनाचे संशोधन केंद्र निर्माण केल्यास माझे प्रस्त नक्कीच वाढणार आहे.माझ्या डाली कंधारच्या महाराणा प्रताप चौकाच्या गुजरीत येणे सुरू झाले.तेंव्हाच माझ्या व्यापार करणाऱ्या व्यापारांचे डोळे माझ्यावर कटाक्ष टाकून कधी एकदाचे ल्हारीच्या ल्हारी भरुन कधी विकून मोकळे होऊ हा विचार त्यांच्या मनात घोळत असेल?काल परवा मला एक गोष्ट कळाली ती अशी पानभोसीचे नगरीचे भूमिपुत्र, वन अधिकारी मा.शिवसांब घोडके यांनी दोन-तीन वर्षापासून शिवमंदिराच्या डोंगरावर दररोज एक वृक्ष लागवड करुन “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” जगतगुरु तुकोबाराय यांच्या अभंगला तंतोतंत आपल्या कृतीतून साकार करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरु आहे.मा.शिवसांब घोडके या वृक्षमित्रांचे मनस्वी अभिनंदन करुन धन्यवाद देत आहे.मला यंदाच्या माझ्या सुगीच्या दिवसात आज वंदनीय राष्ट्रपिता महात्माजी गांधीजींच अन् १५४ व्या अन् वंदनीय भारतरत्न लाल बहादूर शास्त्रीजींच्या ११९ व्या जयंती दिनी त्यांना मी विनम्रभावे अभिवादन करतो.अशा आजच्या अहिंसा दिनी मला सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी बोलके करुन हे आत्मकथन आपल्या पुढे मांडतांना माझ्या आत्मकथनात माझ्या भावनेला वाट मोकळी करुन दिली आहे.शेवटी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांना धन्यवाद देवून मी थांबतो! जय सृष्टी! जय पर्यावरण! जय वृक्षराज!

 

हे पण वाचा

 

सिताफळ’Custard apple – एक महत्वपूर्ण आयुर्वेदिक वनस्पती http://yugsakshilive.in/?p=27708

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *