(दादाराव आगलावे मुखेड)
येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नागेंद्र मंदिर, या केंद्राच्या वतीने बसस्थानक व एस.टी. डेपो येथील स्वच्छता अभियानात असंख्य सेवेकर्यांनी सहभाग नोंदवून परिसर एकदम स्वच्छ केला.
मुखेड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात परमपूज्य गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने अठरा विभागामार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने येथील बसस्थानक व एस.टी.डेपो शेवेकऱ्यांच्या वतीने कर्तव्याचा एक भाग म्हणून स्वच्छ केला.
या स्वच्छता अभियानात केंद्र प्रतिनिधी शंकर मामा पांचाळ, झोन प्रतिनिधी उत्तम कोडगिरे, भास्कर पोतदार, गजानन सोनटक्के, प्रमोद पोतदार, लक्ष्मण वडजे, विनोद पोतदार, विजयकुमार बंडे, सौ. सिंधुताई इंगोले, सौ. महानंदा शेळके, पर्यावरण प्रकृती विभागाच्या सौ. सुलोचना आरगुलवार, श्रीमती अंजली मुखेडकर, सौ. मनीषा पोतदार, सौ.शोभा गुंडाळे, कु. पूजा दमकोंडवार यांच्यासह १८ विभागातील अनेक सेवेकर्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
यावेळी मुखेड आगार व न.प. कर्मचारी बलभीम शेंडगे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे बाल संस्कार वर्गातील चिमुकल्यांनीही स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.