नांदेड (प्रतिनिधी) – श्री यशवंतराव ग्रामविकास – व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरीच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
देशमुख हे राज्य शिक्षण मंडळ पुणेचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नांदेड ग्रामीणचे जिल्हा सरचिटणीस आहेत. लोकसंवाद साहित्य संमेलनाचे हे १८ वे वर्ष आहे. ग्रामीण भागातील नवोदित आणि प्रतिथयश साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून या साहित्य संमेलनाकडे पाहिले जाते.
दरवर्षी नित्यनियमाने होणाऱ्या या साहित्य संमेलनात साहित्यिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.
शोभायात्रा व ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलन असे या संमेलनाचे स्वरूप आहे.
या संमेलनाचे
अध्यक्ष प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे असून, मा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार विक्रम
काळे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिगंबर कदम यांनी दिली आहे.