पाथरी (गणेश जत्ती) ;
धनलक्ष्मी क्राॅप सायन्स प्रा ली च्यावतीने परभणी तालुक्यातील तामसवाडी येथील प्रगतीशील शेतकरी राजेश वैजनाथराव मोरे यांच्या कापुस अडव्हांन्स बीजीटू या वाणावर पिकपहाणी व चर्चा सत्राचे आयोजन दि.बारा आॅक्टोबर रोजी करण्यात आले अशी माहिती झोनल मॅनेजर शिवाजी गायकवाड यांनी दिली .
या कार्यक्रमास कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कमलेश पटेल ,झोनल मॅनेजर शिवाजी गायकवाड ,शामराव रनविर गणेश क्षिरसागर ,ओंकार बरकुले ,गणेश कराड ,सुमित जाधव आदी मान्यवर ऊपस्थीत होते .
यावेळी कार्यक्रमात शेतकर्यांना मार्गदर्शन करताना शिवाजी गायकवाड यांनी कापुस अडव्हांन्स बीटी बद्दल माहिती देतांना सांगितले की ,प्रगतशील शेतकरी श्री .राजेंद्र मोरे यांनी आमच्या कंपनीचे अडव्हांस बीजिटू या कापसाची दहा जुन रोजी लागवड केली .सदरील शेतकर्याने पाच बाय सवा फुट अंतरावर अडव्हांसबीटी ची लागवड केली .तसेच या कापसाच्या पानावर लव भरपुर प्रमानात असल्यामुळे फवारणी कमी लागते व खर्चात बचत होती .
अडव्हांस बीजीटू हे एका झाडाला भरपूर फळफांद्या असल्यामुळे एका फळफांदीला आठ ते पंधरा बोंडे लागतात तसेच कापुस हे पाच पाकळीचे बोंड असुन ते वेचनीस अत्यंत सोपे असे हे वान आहे अडव्हांस बीजीटू हे सर्वात पहिले वजास्त ऊत्पन्न देणारे असे हे वान असुन शेतकर्यांनी पुढच्या वर्षी अडव्हांस बीजीटु अवश्य लावुन जास्तीत जास्त ऊत्पन्न घ्यावे असे यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओंकार बरकुले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुमित जाधव तर आभार गणेश क्षिरसागर यांनी केले
या कार्यक्रमास परभणी जिल्ह्यातील बरेच कृषी विक्रेते व शेतकरी ऊपस्थीत होते .