कंधार ; ( मयुर कांबळे )
लातुर येथील दिलीप विश्वनाथ जाधव (चेरेकर) यांनी इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत जातीय दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्याला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कंधार येथील आंबेडकर अनुयायांनी कंधार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर यांना दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की दिनांक १३/१०/२०२३ रोजी दिलीप विश्वनाथ जाधव चेरेकर यांनी सामाजिक तेढ निर्माण करून दोन समाजात वाद व्हावे व कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने त्यांच्या इंस्टाग्राम या सोशियल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ तयार करून त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दलित महिलांबद्दल अतिशय खालच्या पातळीच्या शिव्या देऊन जातिवाचक व असशील शब्दांमध्ये वक्तव्य करून व्हिडिओ शेर केला आहे त्यामुळे संबंध महिला वर्गाच्या व दलित समाजाच्या भावना दुखावल्या असून आरोपी दिलीप विश्वनाथ जाधव यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मयूर कांबळे,साधनाताई एंगडे, निलेश गायकवाड,सोनिया गायकवाड, कपिल भाऊ जोंधळे, शेख रबाणी, भास्कर कदम, विजेंद्र कांबळे, विनोद कांबळे, राजू कांबळे, विजय कांबळे, आधी कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.