कंधार;(दिगांबर वाघमारे )
भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण हे एक आगळे वेगळे प्रशिक्षण आहे , कोणत्याही प्रशिक्षणात सुलभक बोलत असतो व प्रशिक्षणार्थी ऐकत असतो ऐकत असतो परंतु या प्रशिक्षणात प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी जास्त बोलताना व सुलभक ऐकताना दिसून येते
21व्या शतकातील मुलांना आव्हाने पेलण्यासाठी भविष्यवेधी शिक्षण किती गरजेचे आहे गरजेचे आहे हे या प्रशिक्षणातून शिकायला मिळाले तसेच वाचन साहित्य आव्हान पुस्तिका अतिशय दर्जेदार आहे याचा वापर वापर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच होईल या प्रशिक्षणातून भविष्य विधी शिक्षण गरजेचे आहे व ते शाळेत राबवू असे आवाहन कंधारचे गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी केले .
जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून भविष्यातील विद्यार्थांच्या गरजा लक्षात घेऊन आज पासूनच भविष्यातील उत्तम नागरीक तयार व्हावेत यासाठी व विद्यार्थांना स्वंयम प्रेरणेतून शिक्षण घेण्याची ऊर्जा मिळावी यासाठी शिक्षकांची मानसीकता बदलणारे भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे . यामध्ये शिक्षणाधिकारी प्रा डॉ सविता बिरगे यांच्या मागदर्शनात जिल्हयातील सर्व तालुक्यांत हे प्रशिक्षण दिनांक 9/10/23 ते 12/10/23 व दिनांक 16/10/23 ते 19/10/23 या टप्यात वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्व प्रशिक्षणार्थी पूर्ण वेळ चालू आहे त्याचा एक भाग म्हणून १८७ जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण कंधार येथिल श्री शिवाजी हायस्कूल येथे चालू असल्याचे कंधारचे गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी सांगितले .
कंधार तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , जि.प . शाळेचे मुख्याध्यापक सदर प्रशिक्षण घेत आहेत टप्पा 1. दिनांक 9/10/23 ते 12/10/23 यामध्ये सर्व जिल्हा परिषद हायस्कूल मुख्याध्यापक आणि उर्वरित सर्व केंद्रप्रमुख व केंद्र कुरुळा, बोळका, दिग्रस, आम्बुलगा, फुलवळ, शेकापूर, रुई, गोणार मधील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि दुसऱ्या टप्यात म्हणजे दिनांक 16/10/23 ते 19/10/23 या कालावधीत शिराढोण, चिखली, उस्माननगर, बारूळ, कौठा, मंगलसांगवी, कंधार, पानभोसी व बहादरपुरा मधील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आदीचे प्रशिक्षण होत आहे अशी माहीती आज दि.१८ ऑक्टोबर रोजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रशिक्षण प्रमुख व मार्गदर्शक संजय येरमे यांनी दिली .
खुप साऱ्या अपेक्षा, आव्हाने व त्यावरील उपयोजना आपण कशा प्रकारे सोडवायच्या व जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी आपण व आपल्या सोबत शाळेला, शिकणाऱ्या मुलांना स्वयंप्रेरणेने स्व अध्ययनाचे वैयक्तिक, जोडीने, गटात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, शिकण्यासाठी प्रवृत्त करून तालुक्यातील सर्व शाळेला एक नवीन वैभव प्राप्त करण्याचे सूत्र, नकारात्मक विचार बाजूला ठेऊन आहे . या प्रशिक्षणातून एक नवीन विचार घेऊन सर्वानी कामाला लागावे असे आवाहन श्री वसंत मेटकर शिक्षण विस्तार अधिकारी मार्गदर्शक यांच्या वतीने करण्यात आले .
यावेळी श्री शिवाजी आगलावे शिविअ मार्गदर्शक ,श्री जयवंत काळे केंद्रप्रमुख मार्गदर्शक , श्री माधव कांबळे केंद्रप्रमुख मार्गदर्शक , श्री उद्धव लटपटे केंद्रप्रमुख मार्गदर्शक , श्री एन. एम. वाघमारे केंद्रप्रमुख मार्गदर्शक ,श्री ए आर थोटे केंद्रप्रमुख मार्गदर्शक , श्री उध्दव सूर्यवंशी केंद्रप्रमुख- मार्गदर्शक , आनंद तपासे , सिध्देश्वर मलगिरवार
आदीनी प्रशिक्षणासाठी महत्वाची भुमिका बजावली.