कंधार – लोह्याच्या बड्या बड्या नेत्यांकडून राजीनामा सत्र सुरूच…? भाजपाला लागलं खिंडार ? आता लिंगायत समाजातील प्रभावशाली नेत्यांने दिली पक्षाला सोडचिठ्ठी !

 

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

लोहा-कंधार तालुक्यातील भाजपातील अनेक ज्येष्ठ व अनुभवी तसेच प्रभावशाली पदाधिकाऱ्यांच्या पदाचे राजीनामा सत्र चालूच असल्याने पक्षाला खिंडार पडत असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ‘वस्त्रहरण’ होणार अशीच परिस्थिती असल्याचे वास्तव आहे. आता राज्याचे भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश सचिव व लिंगायत समाजाचे प्रभावशाली ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ शेंबाळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपाला जोरदार झटका दिला आहे.

विद्यमान भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याने व शेतकऱ्यांच्या मनात रोष आणि आक्रोशाची धग पेटत असल्याने व मराठा आरक्षणाचा, आणि लिंगायत धर्म मान्यता देण्यास सरकार अपयशी ठरत आहे. महाराष्ट्रात हे लिंगायत समाज हा नेहमीच भाजपचा पाठिराखा राहीलेला आहे.

आजतागायत भाजपने फक्त समाजाची मते घेतली आहेत पण, समाजाच्या उन्नतीसाठी कधीच भाजप पुढे आला नाही .केवळ समाजाची दिशाभूल केली आहे. सध्या महाराष्ट्रात दोन समाजांतील महत्वाचे प्रश्न आहेत एक मराठा आरक्षणाबद्दलचा रोष आणि दुसरे म्हणजे लिंगायत समाजा धर्म मान्यता त्यामुळे या सरकार बद्दल जनतेत आक्रोश आहे . त्यामुळे मी दत्ता भाऊ शेंबाळे फुलवळकर प्रदेश सचिव, किसान मोर्चा भाजपा (महाराष्ट्रराज्य ) या पदाचा नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वखुशीने राजीनामा देत आहे, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . पुढे त्यांनी म्हटले आहे की,

उपरोक्त विषयी मी दत्ताभाऊ शेंबाळे,नांदेड आपल्याकडे माझ्या प्रदेश सचिव किसान मोर्चा भाजपा या पदाचा राजीनामा देत असून सध्याचे शिंदे,फडणवीस आणि पवार यांच्या निष्क्रिय अन् बोलघेवड्या व दिशाभूल करणा-या सरकार मध्ये राहून काम करण्यापेक्षा राजीनामा देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून विद्यमान सरकारच्या विरोधात काम करण्यासाठी मी नैतिकदृष्ट्या विचार करून राजीनामा देतो आहे. मी सदर राजीनामा का देतो आहे याची काही ठळक कारणे पुढीलप्रमाणे नोंदवलेल्या आहेत.

*शेतकऱ्यांच्या आत्महत्या* *थांबवण्यात सरकार अपयशी -*
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात शिंदे फडणवीस आणि पवार सरकार सपशेल अपयशी ठरले आहे,हे सांगण्यासाठी कोणत्याही जाणकाराची गरज नाही हे आपणही जाणताच.
शेतीला पुरेशी मोफत वीज पुरवठा न देऊ शकणारी शेतकरी विरोधी सरकार असल्याने शेतकऱ्यांच्या मनात भाजपा बद्दल प्रचंड रोष आहे. म्हणून हा माझा राजीनामा आहे.

*शेतमालाला कवडीमोल भाव*
रक्ताचे पाणी करून काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देऊन उद्योगपती व भांडवलदारांचे हित साधणा-या या शिंदे,फडणवीस, पवार सरकार बद्दल आक्रोष असून त्यांना भाजपाचा वीट आल्यामुळे हा राजीनामा आहे.

शेतक-यांच्या मालाला योग्य बाजार पेठ व रास्तभाव देऊ शकले नसल्याने शेतकऱ्यांना देशोधडीस लावणा-या सरकार मध्ये राहणे म्हणजे शेतकऱ्यांचा शाप माझ्या सारख्या शेतकरी पुत्राला कपाळाला पेलणारी बाब नाही.ते भाजपा सारख्या मुर्दाड, संवेदनाहीन पक्षालाच पेलणारी बाब आहे म्हणून भाजपा तुम्हाला लखलाभ होवो म्हणून हा राजीनामा देतोय.

*नांदेड जिल्हा एकाधिकारशाहीनै* *त्रस्त*
नांदेड जिल्ह्यातील भाजपात असलेल्या एकाधिकारशाही आपल्याला संपुष्टात आणने शक्य झाले नाही म्हणून हा माझा राजीनामा आहे.
*मराठा व लिंगायत समाजाकडे* *डोळेझाक*

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याचे औदार्य न दाखवणा-या संकुचित वृत्तीच्या भाजपाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हा माझा राजीनामा आहे.

मराठा समाजासाठी ४०दिवसांचा आवधी घेऊनही पुरावे मिळाले नाहीत ,टिकणारे आरक्षण देण्याची ढोंगबाजीची भाषा करत आरक्षण न देण्याची धुर्त मानसिकता ठेऊन त्यांची सतत उपेक्षा करून मराठा समाजात उभी-आडवी फूट पाडणा-या कूटनीतीच्या या शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारचा जाहीर निषेध म्हणून मी माझ्या प्रदेश सचिव, किसान मोर्चा भाजपा पदाचा राजीनामा त्यांनी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेशाध्यक्ष यांच्या कडे पाठवला आहे .

त्यामुळे कंधार तालुक्यातील भाजपा पक्षाला खिंडार पडले आहे. ही बाब भाजपाला कदापी परवडणारी नाही.,अशी सर्व स्तरातून चर्चिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *