जी व्यक्ती या दोन शब्दांवर काम करते ती कायमच त्याच्या स्वप्नाना सोबत घेउन पुढे जाते. तिला हव्या असलेल्या गोष्टी साध्य करता येतात.. बाहेर कितीही भुंकणारे असले तरिही ती सतत कार्यरत असते.. आपले पंतप्रधान मोदीजी यांच्या बद्दल मी ऐकलय रोज पहाटे ४ वाजता उठून व्यायाम करुन ते त्यांच्या कामाला सुरुवात करतात.. इतक्या बिझी शेड्युल मधुन जर रे रोज एक तास स्वतःसाठी काढु शकतात तर आपण का नाही ??.. अक्षय कुमार रात्री ९ .३० वाजता झोपुन ४ वाजता उठून वर्काउट करु शकतो तर आपण का नाही ??असे अनेक सारे प्रश्न आपण आपल्याला विचारायचे आहेत.. अनेक यशस्वी मंडळीच्या केसाची किवा कपड्याच्या फॅशनला फॉलो करायचय की त्यांच्या कष्टाना फॉलो करायचय हेही आपल्याच हातात आहे.. मी रोज सकाळी हरे कृष्ण म्हणायला सुरुवात केल्यावर काही जणानी ४ दिवस ते केलं नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या.. भगवंताचं नाव घेतलं तर फायदा तुमचाच आहे .. कुठल्याही गोष्टीत सातत्य नाही आणि आपली आपल्या सोबत कमीटमेंट नाही .. चार दिवस धडाधड व्यायाम करायचा , चार दिवस डाएट करायचं पाचव्या दिवशी निघाले पुन्हा पार्टीला.. कित्येकदा कित्येक जणांच्या तोंडी ऐकलय योगाने वजन कमी होत नाही..म्हणजेच याचा अर्थ सातत्य कमी पडतय त्या योगा थेरपीला दोष का द्यायचा ??.. वर्षानुवर्षे सेम वेळेला व्यायाम आणि रोज सेम वेळेला आहार आणि झोप घेतली तर वजन कंट्रोलमधे राहायलाच हवं.. माझ्या मित्राचा एक किस्सा सांगते..वजन १०० किलोच्या वर..रोज व्यायाम होइल म्हणून जीममधे वर्षभराचे एकदम पैसे भरले. १५ दिवस रोज न चुकता जीमला गेला एक किलो वजन कमी झालं म्हणुन खुशही झाला..१६ व्या दिवशी जीमशेजारी असलेल्या रेस्टॉरंटला जीमला न जाता त्याने मिसळ खाल्ली.. मग तिथुन पुढे तो जीमला गेलाच नाही..पैसेही वाया आणि सातत्यचं काय आणि कमीटमेंट ..??मुळात व्यायाम ही जगण्याची शैली आहे.. जगण्याचा दुवा आहे.. जगण्यातलं सौंदर्य जाणुन घ्यायचं असेल तर व्यायामाला म्हणजेच सातत्य आणि वचनबध्दता यांना पर्याय नाही.. थंडीत व्यायाम करायचा असेल तर फक्त थंडीतच जेवा इतका सिंपल फंडा आहे.. मी रोज काहीना काही लिहीते आणि वाचते म्हणुन पुस्तक लिहु शकते.. तसच प्रत्येकजण जो व्यवसाय करत असेल त्यात दिनक्रमात सातत्य हवं..आपल्या घराजवळचा दुकानदार ( मारवाडी ) पहा.. थंडी असो की पाऊस चार वाजता मार्केटयार्ड ला जाऊन फळं भाजी घेउन येतो तेव्हा तो दिवसभर धंदा करतो… जे आपण आपल्यासाठी देणार आहोत तेच आपल्याकडे येणार आहे किवा रहाणार आहे.. नात्याच्याही बाबतीत तेच.. कमीटमेंट कमी पडते ..
सातत्य आणि वचनबध्दता या दोन क्रिया आपल्या हृदयासारख्या आहेत .. त्या बंद की सगळं बंद.. त्यामुळे या दोघांना सोबत घेउन आपण पुढे जाणार आहोत… तुमचे वाचनाचे सातत्य माझ्या रोज नवीन काहीतरी लिहीण्याच्या कमीटमेंटला दिलेले खुराक आहे त्याबद्दल मी तुमची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi