कंधार / प्रतिनिधी
बिजेवाडी खेमा नाईक तांड्याचा ध्येयवादी तत्वनिष्ठ अमोघ वक्तृत्व शैलीचा एकनिष्ठ , एकवचनी स्व लालूनाईक खेमानाईक जाधव यांचे आज नामांकित लोटस हॉस्पिटल नांदेड येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाल्याची बातमी दि 27 ऑक्टोबर 2023 रोजी सांयकाळी 5 वाजता कळाली. ही वार्ता ऐकून मन सुन्न झाले.संबंध बंजारा बाधव आणि समाजावर शोककळा पसरली,
लालू नाईक यांचे अचानक जाण्याने सर्वाचे उर दाटून आले . प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहत होते . एक धैर्यवान, मेहनती, पोलादी, पुरुषांनी शेवटची चिरनिद्रा घेतली .
मला आत्ताच मरायचे नाही आणखी बरेच काही घडवायचे आहे. असे खडे बोल काळाला सुनावणाऱ्या लालूनाईक खेमानाईक जाधव यानी अनेक वेळा काळाला हुलकावणी दिली परंतु यावेळी काळ त्यांच्यापेक्षा वरचढ ठरला. कुटुंबातील अनेक दुर्घटनांचा सामना करत दुःख गिळून सर्वांना आधार देणारा आधारवड आज उन्मळून पडला. आयुष्याची 95 वर्षे दोघा भावांच्या कुटुंबातील
आणि आपल्या पांचही पांडव सुपुत्रांना एकत्रित मोट बांधून यशस्वी एकत्रित कुटुंबाची समाजाला साक्ष देणाऱ्या एका बलवान कुटुंब प्रमुखाचा आज अस्त झाला. विजेवाडी खेमा नाईक तांडा येथे एका तणकटाच्या झोपडीत जन्माला आलेला स्वतः अशिक्षित राहून
सेवादास महाराज भटक्या विमुक्त जाती मंजूर सहकारी संस्था बिजेवाडी ( खेमा नाईक तांडा ) ता. कंधार या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहून 1972 च्या प्रंचड दुष्काळात गोर गरीब जनतेला संस्थेच्या माध्यमातून काम देऊन प्रचंड दुष्काळात पोटभर अन्न देण्याच काम लालू नाईकानी केले
तसेच आपले धाकटे बंधू लक्ष्मण खेमानाईक जाधव यांना सोबत घेऊन शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय ,काकाडी जि नांदेड येथे शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारा व त्या माध्यमातून अनेक डॉक्टर , इंजिनिअर, वकील, सनदी अधिकारी घडविण्यासाठी
अति मागासलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून शिक्षण उच्च प्रतिचे देऊन डॉक्टर कलेक्टर , वकिल , प्राध्यापक , पुलिस , तलाठी करणारे हे दोघे बंधू पैकी स्व लालूनाईक जाधव गरिबांचे मायबाप म्हणून ओळख ठेवून निघून गेले. बलदंड शरीर लाभलेले लालू नाईक नजरेत भरणारे व्यक्तिमत्व होते. साहस आणि धाडसी गुण लालू नाईक यांचे गुण प्रेरणा देणारे होते. ते एक वेळ ग्राम पंचायत बिजेवाडीचे उपसरपंच पद भुषविले आणि दोन वेळा ग्राम पंचायत सदस्य म्हणूण प्रतिनिधित्व केले.
त्यांचे सहज बोलणेही एक विद्वान प्रबोधन करण्यासारखे असायचे. शेती हा त्यांचा आवडता विषय. शेकडो क्विटल कापूस तथा ऊस सोयाबीन , ज्वारी उत्पादन करणारे लालू नाईक एकमेव शेतकरी होते.
तांड्यात तथा पंचक्रोशी छोटे मोठे भांडण तथा तंटे सोडावण्यात त्यांचा हातखंडा होता. घेतलेला निर्णय अचूकच असावयाचा मग जवळचा असो किंवा परिवारातील अथवा मित्र असो त्याची पर्वा न करता नेटाने आणि धाडसाने अमलात आणण्यासाठी पुढे धावणारा हा बंजारा अष्ठपैलू नेतृत्व गुणी व्यक्तीमहत्त्वात ठासून भरलेला नायक कला , क्रिंडा , संस्कृती तथा राजकारणातील वेगवान धावपटू अखेर दमला आणि थांबला.
लालू नाईक यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना आपूलकीने जवळ केले आणि सांभाळले ही त्यांची शिदोरी पुढे त्यांचे वारसांनी खंबीरपणे चालवत आहेत.
घरी येणाऱ्या प्रत्येक लोकांची आस्तेवाईकपणे विचारपूस करून प्रत्येकाला जेवण करूनच पाठावयाचे हिच परंपरा आजही त्याचे सुपत्र वारसा पुढे अविरत चालू ठेवले आहे .
अशा या मानवी रूपी धाडसी व वाघाचीच आज काळाने शिकार केली. त्यांचे सुपुत्र कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम जाधव
यांनी आपल्या वडिलांची अधिक सेवा केली. या कामी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विठ्ठल लालू जाधव , श्री भगवान लालू जाधव , पोलिस जमादार शिवाजी लालू जाधव , पोलिस जमादार पंढरी जाधव यांनी तळहातावर जोपासले शेवटी जो जन्माला येतो तो कधी ना कधी जाणारच या निसर्गाच्या न्यायाने आज लालूनाईक आपल्यातून निघून गेले.अशा या काळालाही घाबरवणाऱ्या मानवी रूपी वाघाला सलाम! त्यांच्या पश्चात 5 मुले 2 मुली नातू पतू , जावाई सह जवळपास 100 सदस्याचा मोठा परिवार आहे .
शिव शक्ती शिक्षण प्रसारक मंडळ बिजेवाडी खेमा नाईक तांडाचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मण खेमानाईक जाधव यांचे ते वडील बंधू होत.
लालूनाईक यांचे अकाली जाण्याने बिजेवाडी सह पंचक्रोशित शोककळा पसरली आसून , सर्व गोर गरीब तथा संगे सोयरे , मित्र मंडळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते
ज्येष्ठ नेते संभाजीराव पाटील केंद्रे, सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जाधव, ज्येष्ठ नेते बाबुरावजी गंजेवार ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष भगवान राठोड भाजपाचे तालुकाध्यक्ष किसनराव डफडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारोतराव पंढरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, माजी पस सदस्य उत्तमराव चव्हाण, सुंदरसिंग जाधव, यांच्या सह परिसरातील बिजेवाडी, तळ्याचीवाडी फुलवळ, कंधारेवाडी, पानशेवडी जंगमवाडी,शेकापूर, संगमवाडी परिसरातील सरपंच चेअरमन उपस्थित होते .