अहमदपूर ; सर्वांनी रामायणातील नातेसंबंधाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यातील नैतिकता अंगीकारावी असे प्रतिपादन डाॅ.भूषणकुमार जोरगुलवार यांनी केले. रामायण व महाभारत यांत पस्तीस पिढ्याचे अंतर आहे. या पस्तीस पिढ्यांत नातेसंबंधातील नैतिकता अवनत झाल्याचे आपल्याला दिसते.
महाभारतात व आपल्यांत 205 पिढ्यांचे अंतर आहे. आज तर आपल्याला रावण व दुःशासन बहुसंख्येने भेटतात. ते आपल्या मनाचे आपण निरीक्षण करून मनातील रावणाला संधी न देता मनातील रामाचा विकास केला पाहिजे असे प्रतिपादन डाॅ. जोरगुलवार यांनी आपल्या पावणेदोन तासाच्या व्याख्यानात केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हे व्याख्यान रेणुका भुवन येथे आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी श्री.अभय किशनराव जोशी यांनी दुग्धप्राशनाचे आयोजन केले होते. श्री.दिलीप शास्त्री यांनी याप्रसंगी राधाकृष्ण मंदिरास सव्वालाख व सावरकर स्मारकास ₹ 21000 ची रक्कम दान केली. या कार्यक्रमास अॅड. भारत चामे, डाॅ.श्री व सौ.अंजली चंद्रकांत उगीले, डाॅ.श्री व सौ.शरयू सुनील चलवदे, डाॅ. श्री व सौ. राधिका मधुसूदन चेरेकर, डाॅ. शशिकांत गुणाले, श्री.व सौ.कलावती शिवमूर्ती भाताम्ब्रे,अॅड. वीरनाथ कोरे, श्री. बाबासाहेब देशमुख, नीलकांत ऊगीले, दत्तात्रय, उगीले, राम पाटील, श्रीमती अनुपमा कदम, अलका कुलकर्णी, श्री व सौ. मनीषा केशव मुंडकर, सौ.अंजली सागर कुलकर्णी, पं जुगलकिशोर शर्मा, मकरंद जोशी, शरद जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष सोलपूरे, अशोक गायकवाड, समीर सय्यद यांनी परिश्रम घेतले.