दिवाळी आणि वाढणारे वजन..

लग्न सराई असो , दिवाळी असो सगळ्यात मोठी आपण चुक करतो ती म्हणजे बाहेर शॉपिंगला गेलो की तिथेच अरबट चरबट खाणे..
काल मी दोन वेळा घरातुन बाहेर पडले अर्थात दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी.. शॉपिंगसाठी नाही … त्यावेळी केलेलं निरीक्षण म्हणजे बोनस मिळालेला होता , रविवार होता.. मंडळी शॉपिंगला बाहेर पडली होती आणि सोबत होतं बाहेरचं खाणं.. त्यांनी ठरवलं असतं तर घरात कुकींग करुन जाऊन शॉपिंग झाल्यावर जेउ शकले असते किवा काय आणि किती खावं हे समजलं असतं तरीही खुप फरक पडु शकतो..
किवा सोबत ड्ब्यात स्प्राउटेड मुग , ड्रायफृट्स ठेउ शकले असते..
आपण म्हणतो कडु , आंबट ,तिखट , गोड , खारट हे सगळे रस पोटात जायलाच हवेत पण डाएट नावाचा राक्षस मधे येतो आणि आम्ही दिवाळीचा घरी केलेला फराळ खात नाही का तर वजन वाढेल पण बाहेर जाऊन खातो.. घरचं अन्न प्रमाणात खाल्याने वजन वाढत नाही तर बाहेरचं तेल , आणि न्युट्रीशन व्यॅल्यु नसलेले पदार्थ खाल्याने वजन वाढतं… दिवाळी शॉपिंगच्या निमित्ताने आळशी मंडळी आधीच पंधरा दिवस व्यायाम बंद करतात निमित्त असतं साफसफाई आणि शॉपिंग.. आणि पुढे दिवाळी होवून अनेक दिवस झाले तरीही व्यायाम करत नाहीत कारण आळशीपणाची शरीराला सवय लागते.. व्यायाम न करणाऱ्याला निमित्त हवच असतं.. त्यांची वेगवेगळी कारणं ऐकली की हसायला येतं..

त्यामुळे घरी केलेला फराळ खाऊन रोज व्यायाम करायचा आहे कारण त्या पदार्थात या हवेला लागणारे आणि शरीरात उष्णता वाढवणारे घटक असतात .. अनारस्याला लावलेली खसखस असेल , ड्रायफृट असतील ,करंजीतील खोबरं असेल बेसन म्हणजेच प्रोटीन्स असे अनेक शरीराला उपयोगी पदार्थ फराळात आहेत.. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाऊन व्यायाम केला तर एक किलो सुध्दा वजन वाढणार नाही..

फळं , सलाड यावर जास्त भर देउन आपण वजनावर नक्की नियंत्रण मिळवु शकतो.. मी रोज खात असलेल्या गोष्टी सांगते.. जरुर खा.. मोड आलेले हिरवे मुग आणि पालेभाजी भाकरी उत्तम न्युट्रीशन असलेला हलका आहार .. सोबत कोशींबीर , जवस कारळं चटणी… यासारखं अन्न नाही.. सण एंजॉय करताना वजन न वाढु द्यायचे असेल तर छोटे बदल खुप गरजेचे आहेत..

#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *