तृषार्त पथिक

तृष्णा म्हणजेच तहानलेला त्यावरुन आलेला तृषार्त हा शब्द.. आणि पथिक म्हणजेच वाटसरु किवा प्रवासी..
तृषार्त पथिक हे अमेरिकन सन्यासाचे रोमांचक आत्मवृत्त आहे.. मला आत्मवृत्त वाचायला आवडतात.. बेडवर , सोफ्यावर कायम एक दोन पुस्तके असतात.. भगवद्गीता , श्रीमदभागवत असतच..
अनेकांनी मला मेसेजेस केले.. मॅम दिवाळीत काय प्लॅन..
दिवाळी , दसरा काहीही असो सगळ्यात आधी रोज न चुकता व्यायाम झालाच पाहिजे .. त्यावेळी मी शॉपिंग करत नाही .. आधीच करते.. आपण लक्ष्मी पूजन करतो त्याचसोबत मी रोजच सरस्वतीची पुजा करते.. न चुकता रियाज म्हणुन आर्टीकल लिहीते आणि काहीना काही वाचते.. डाएटचच खाणार आणि थोडं फराळाचं सुध्दा खाणार.. हे पुस्तक खूपच इंटरेस्टींग आहे त्यामुळे दुपारी वाचन हवच .. अशी पुस्तके वाचताना जाणवतं , की या जगात कोणीही पूर्णतः सुखी नाही आणि कोणीही पूर्णतः दुखी नाही.. प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे.. प्रत्येकाची एक रोमांचक प्रेम कहाणी आहे .. वाईट काहीही नाही तर भगवंताप्रती असलेली ओढ म्हणजेच तृषा किवा तृष्णा शमवायला हा अमेरिकन वाटसरु भारताची वाट धरतो .. त्यात त्याला माया कशी प्रत्येक क्षणात मोहात पाडते.. भगवंताला जाणुन घेणं इतकं सोप्पं कसं असेल ना..
त्याला वाटेत एक सुंदरी भेटते तिलाही याच मार्गाने त्याच्यासोबत चालायचं असतं पण मग विधीलिखीत काय असतं ??,,, दिवाळीत वाचुन पूर्ण करणार आहे..
ज्याच्या जवळ पुस्तके आहेत त्याला आयुष्यात एकटे कधीही वाटणार नाही.. खुप दिवसानी मुलगी येणार.. दोघीही पुस्तक वेड्या आहोत.. माझ्यासाठी रोजच दिवाळी असते ..त्यामुळे नॉर्मल रुटीन.. या पुस्तकातील रिचर्ड हा अमेरिकन म्हणजेच जगातील महासत्ता , आर्थिक बळ , तांत्रिक प्रगती ,सेक्स , ड्रग्ज , मदिरा , गांजा अशा वातावरणात लहानाचा मोठा झालेला रिची याला तहान होती प्रवाहाच्या विरूध्द जाऊन काहीतरी करण्याची.. त्याला हवी होती ज्ञान आणि प्रेमाची गंगा .. अखेर भागीरथी गंगेने त्याला जवळ घेउन हरीनामाचे गीत प्रदान केले.. तृषार्त पथिकचा राधानाथ स्वामी कसा झाला ??.. जसा वाल्याचा वाल्मिकी झाला.. त्याचप्रमाणे आपणही आपल्याकडील वाईट गोष्टी बाजूला सारुन चांगल्या गोष्टीना जवळ करु शकतो.. कोणी व्यसनं सोडत असेल तर त्याला ती सोडवायला आपण मदत केली पाहिजे.. कोणी बदलत असेल तर आपण त्यावर हसायला नको.. कोणाच्या priorities बदलत असतील आणि त्यासाठी ती व्यक्ती आपल्यापासुन काही काळ दुर गेली तर त्याचा राग नको ..
या दिवाळीत प्रत्येकाने एक चांगली सवय लावुन घ्यायचा प्रयत्न करुयात.. प्रत्येकाची तहान वेगळी आहे .. त्याचसोबत त्याचा मार्गही खडतर आहे..
दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा..

सोनल गोडबोले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *