सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व राष्ट्रसंत वटेमोड महाराज यांचा 7 वा स्मृतिदिन विशेष

कठोर परिश्रमातून अतिशय मेहनतीतून घडून पुढे आलेली माणसं समजूतदार असतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मानाचे पद उत्तुंग झेप घेऊनही काही माणसं जमिनीवर पाय ठेवून व्यवस्थित वावरत असतात. सदैव वारकऱ्यांमध्ये लोकांसाठी कार्यरत राहणार हा स्थायीभाव त्यांच्याकडे होता ,आपल्या गोड बोलण्याने व मृदू स्वभावामुळे त्यांनी सामान्य माणसाच्या मनात प्रेमळ स्थान प्राप्त करून ठेवले होते .प्रश्न कुठला आणि कोणाचाही असो त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्यांचे सोडवणूक करणे आणि समोरच्याला न्याय मिळवून देणे हीच कार्यपद्धती त्यांनी सुरुवातीपासूनच वापरली होती. सामाजिक कार्यात आवश्यक असणाऱ्या सर्वच नेतृत्व गुणाची परिपूर्णता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. नि:स्वार्थी वृत्तीने त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच समाजाच्या विकासासाठी योगदान दिले.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सिद्धतीर्थधाम येथे कृष्ण जन्माष्टमी ८ सप्टेंबर 1947 रोजी आई जनाबाई व वडील माधवराव यांच्या पोटी नरसिंग वटेमोड महाराज यांचा जन्म झाला. बालपण सर्व सिद्धतीर्थधाम येथेच गेले त्यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी केंद्रीय प्राथमिक शाळा सिद्ध तीर्थधाम,पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण सीनियर बेसिक स्कूल मांजरम, ता.बिलोली तर आठवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण गव्हर्मेंट मल्टीपर्पज हायस्कूल फॉर बॉईज नांदेड येथे झाले.आयुर्वेदाचे शिक्षण अत्रेय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे झाले. बालपणापासून परमेश्वराची भक्ती योग व मंत्र शास्त्र बद्दल आवड होती, कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची व रहस्य उघडून पाहण्याची उपजत बुद्धी त्यांच्याकडे होती.
शालेय शिक्षणाबरोबर संत साहित्याचा अभ्यास त्यांच्या वडिलांनी त्यांच्या कडून करून घेतला होता. त्यांना साधुसंतांचा सहवास लाभला, त्यांचे मार्गदर्शन मिळाले, त्यानंतर महाराजांनी गृहत्याग केला लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपला वेळ घालवण्याचे ठरवले, भारतामध्ये असणाऱ्या महान तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या व तेथील परिसराचा अभ्यास केला ,त्यात त्यांनी बद्रिकाश्रम, प्रयाग, हरिद्वार, वाराणसी, पंढरपूर ,गाणगापूर आळंदी येथे जाऊन अनुष्ठान केले. त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करण्याचे ठरवले. भारत भ्रमण करून ते परत सिद्धतीर्थ धाम येथे आले, येथील सर्व आजूबाजू चा परिसर अशिक्षित आज्ञांनी
,अंधश्रद्धाळू आहे काही लोक कर्मकांडात गुरफटलेले गेले आहेत. त्यांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे म्हणूनच राष्ट्रसंत वटेमोड महाराजांनी सिद्धतीर्थधाम येथे पंचपिठ( शिवपीठ ,भक्तीपेठ. शक्तीपीठ. सिद्धपीठ. भैरवपेठ) .या तीर्थक्षेत्राचे स्थापना केली आहे ,
त्या ठिकाणी अनेक देवतांची मंदिरे बांधून भक्तांना दर्शन घेण्यासाठी सुलभ करून ठेवले आहे .शिवाय भक्ती म्हणजे अंधश्रद्धा होय ,योग. मार्गाला ज्ञानाची व भक्तीची जोड देऊन सर्वसामान्य माणसाला मुक्तीची वाट दाखवली ,त्यासाठी तेथे अनेक मंदिरे त्यांनी बांधली भक्तांसाठी दरवर्षी मल्हारी मार्तंड वार्षिक महोत्सव साजरा कर केला जातो ,ही परंपरा गेल्या 30 वर्षापासून चालत आलेली आहे. दरवर्षी सिद्धतीर्थधाम येथे वारू, वाघे ,उपासक ,भगत यांचे महासंमेलन भरत असून त्यात अनेक नवीन प्रस्ताव तयार केली जातात अनेक समस्यांचे निराकरण केले जाते आश्रमामध्ये येणारा भक्त निराश मनाने येतो व महाराजांची भेट घेतल्यानंतर अतिशय आनंदाने घरी जातो, कारण त्यांच्या मनातील इच्छा हळूहळू पूर्ण होताना दिसतात ,सर्व जातीधर्मांना एकत्रित करून समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य महाराजांनी दिंडीच्या रूपातून पूर्ण केले, नांदेड येथून पायी दिंडी काढून सर्वधर्मसमभावाची शिकवण देऊन *या रे या रे लहान थोर* म्हणून त्यांनी मुखेड तालुक्या तील येवती येथील नराशाम महाराज मठापर्यंत पायी दिंडी घेऊन येत असत, त्यामुळे आपण सर्वजण एक आहोत अशी भावना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत असे, मी श्रीमंत आहे ,मी गरीब आहे हे भेदभावाची दरी माणसातून निघून जाते असा हा दिंडीचा निर्मळ व स्वच्छ हेतू होता. म्हणून महाराजांनी अशा पद्धतीने गोरगरीब लोकांना आपण सर्वजण एक आहोत याची जाणीव करून देत असत तसेच ते आयोध्या ,काशी ,प्रयाग नाशिक या ठिकाणी नेऊन लोकांना त्या भागातील लोक कसे राहतात ,त्यांच्या चालीरीती कशी आहेत तेथील भौगोलिक क्षेत्र याविषयी माहिती देत असतात.त्यामुळे पर्यटनातून भक्तांना ज्ञान मिळत असे. नाशिक येथील कुंभमेळ्यामध्ये हजारो लोकांना नेऊन त्यांनी तेथील शंकराचार्यांचे दर्शन घडवून आणले. म्हणून त्यांना सामान्यातील असामान्य व्यक्ती असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही असे मला वाटते .शाळा- विद्यालय काढून विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षण कर्मयोगी ते होते.
आज सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या विद्यालयातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही शैक्षणिक परिवर्तनाची सुरुवात आहे ती त्यांनीच केली, त्यामुळे त्यांना चैतन्याचा महामेरू असे मला म्हणावं वाटते ,आपले सर्व ज्ञान एकत्रित करून त्यांनी पुस्तक रूपाने त्यांचे अस्तित्व पाठीमागे ठेवलेले आहे, आज त्यांच्या नावावर दहा ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या दहा ग्रंथातून आपण त्यांची माहिती थोडक्यात करून घेणार आहोत खरोखरच एवढे पुस्तक लिहिणे म्हणावे तशी सोपी गोष्ट नाही महाराजांनी मन :शांतीचा शोध हे पुस्तक लिहून मनाला शांती कशी मिळते त्याची माहिती दिली,आयुर्वेद विद्याभारती या पुस्तकातून त्यांनी आपली ध्येय ,शुद्धी मलमूत्र विसर्जन तोंड धुण्यासाठी दंतशोधक चूर्ण चा उपयोग कसा करावा हे माहिती त्यांनी त्यामधून दिली, आयुर्वेद हे अतिशय महत्त्वाचे आहे हे त्यांनी ग्रंथ रूपाने आपल्यापुढे मांडले आहे ,आयुर्वेद भूत विद्या या ग्रंथातून पृथ्वी, आप ,तेज , वायू ,आकाश यांच्यापासून कसे बनले आहे याची माहिती त्यांनी दिली आहे, पाखंड प्रश्नोत्तरे महाराजांनी प्राचीन काळापासून आपल्या बौद्धिक क्षमतेने दुसऱ्या व्यक्तींना कसे जिंकता येते, याची माहिती संशोधनातून अनुभवा तून आपले विचार प्रकट केले आहेत. *अहंकार गेला तुका म्हणे देव झाला* असं म्हणता येते म्हणून माणसाने अहंकार सोडावा,
वास्तुशास्त्र विचार ,घर बांधते वेळेस घराला कोणता कलर असावा ,जमीन शुभ कशी असावी ,ती कोणत्या ठिकाणी निवडावी तिचा रंग कसा असावा याची सगळी माहिती त्यांनी वास्तुशास्त्र ग्रंथातून दिली आहे ,
लोक व्यसनमुक्ती ग्रंथातून व्यसनामुळे किती संसाराची राख रांगोळी झाली दुर्व्यसनी माणसं काहीही करू शकतात ,दुसऱ्यांचा आदर करत नाहीत, कुटुंबामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, दारू शिवाय त्यांना झोप लागत नाही ,त्यांचा समाजामध्ये धाक नसतो, अशा सगळी माहिती त्यांनी अशा लोकांना दारू, गांजा यामुळे हे लोक वाया जातात याची माहिती सांगितले, तसेच स्वप्न साधना विचार, प्रत्येक माणसाला स्वप्न पडतात स्वप्नाचे दोन प्रकार आहेत जागृत अवस्था, प्राकृतिक अवस्था या पुस्तकातून दिली आहे, बुवाबाज तंत्र बुवाबाजी मुळे लोक एकमेकांना फसवले जातात पूतना मावशीने श्रीकृष्णाला फसवण्याचा प्रयत्न केला, तसेच भानामती, जादू संपूर्ण जगामध्ये भानामती जादू चटूक करणे या सर्वत्र आहेत त्यामुळे त्याच्यावरील महाराजांनी चांगला ग्रंथ लिहून लोकांना ,भक्तांना उपदेश केला आहे. अशा पद्धतीचे काही इंग्रजीतूनही साहित्य त्यांनी लिहिलेले आहे. आपल्याला वर्तमानपत्रातून लेख लिहून समाज प्रबोधनाचे भावी प्रभावी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा शिष्यवर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अनेक गावांमध्ये जाऊन कीर्तन ,प्रवचन करून समाजातील अंधश्रद्धा व्यसनमुक्ती यावर कडक ताशेरे त्यांनी ओढले आहेत. त्यांच्या संपर्कात असणाऱ्या भक्तांनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारून स्वतःपासून सुरुवात करून समाजसेवा सुरू केली आहे अशीही आपल्याला सांगता येते त्याची परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्यांचं कार्य जिवंत ठेवण्याचे काम आपण करणार आहोत म्हणून कोणत्याही व्यक्तीचं कार्य हे मरू न देता त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत असे मला वाटते. म्हणूनच आपण सर्व कार्य त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत. विठूमाऊली प्रतिष्ठानच्या वतीने गोकुळवाडी ,खैरकावाडी येथे त्यांचे कार्य चिरंतन चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्फर्ती देणे , अपंगांना मदत करणे, ज्येष्ठाचा आदर करणे या गोष्टी महाराजांच्या स्मृतीच्या दिनाच्या निमित्ताने आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत *जे का रंजले गांजले। त्याशी म्हणे जो आपले।। तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा*
या संत उक्तीप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करू त्यामुळे त्यांच्या या पवित्र स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी येथेच थांबतो

*शब्दांकन*
*प्रा.विठ्ठल गणपत बरसमवाड* संस्थापक अध्यक्ष : विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी, गोकुळवाडी
ता. मुखेड जि. नांदेड
भ्रमणध्वनी, 99 21 20 85 63

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *