बाजीगर टिम इंडिया
जीतेगा, इंडिया जीतेगा… असा हा नारा 19 नोव्हेंबर 2023 वार रविवार रोजी संपूर्ण भारताचा आवाज बनला होता. 140 कोटी देशवासियांचा, जो विश्वविजेता बनल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला होता.
भारत वरसेस ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकचा अंतिम क्रिकेट सामन्या होणार होता. हा सामना पाहण्यासाठी अबाल- वृद्ध पुर्णपणे तयार झाले होते. खूप उत्सुकता ठेवून ही ऐतिहासिक स्पर्धा भारत जिंकेल, अशी आशा संपूर्ण भारताला होती.
तर दुसरीकडे खेळाडूंचा उत्साह आणि मनोबल वाढवण्यासाठी आणि हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज नेते, कलाकार जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या सेडीयमवर जमले होते.
क्रिकेट विश्वचषक जिंकून भारत विश्वविजेता होण्यापासून फक्त काही पाऊल दूर होते अशी मनात अपेक्षा बाळगून होता.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी रोहित शर्माची सेना सज्ज झाली होती हा सामना अतिशय महत्त्वाचा आणि चुरशीचा होणार होता.
माझ्यासह जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो. जल्लोष, उत्साह, ऊर्जा, भव्यता आणि खिलाडूवृत्तीने भरलेला हा प्रसंग भारतीयांसाठी खरोखरच ऐतिहासिक ठरला होता.
टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच भारतावर दबाव बनवला होता.
वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय टीमने सलग दहा सामने जिंकून फायनल मध्ये प्रवेश केला होता. परंतु फायनल मध्ये आपली फारशी चमक टीमला दाखवता आली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्ररक्षकांनी संपूर्ण सामन्यात उत्तम फिल्डिंग करत भारतीय फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. हेडनं अप्रतिम झेल घेत भारताला बॅकफुटवर ढकललं. नंतर
शमी आणि बुमराने पहिल्या दहा ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट काढल्यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
ट्रॅव्हिस हेडने मॅच विनिंग शतकी खेळी केली आणि त्याला मार्नस लाबुशेनची दमदार साथ मिळाली.
किरकोळ आव्हानाच्या सामन्यात डोके शांत ठेवून “हेड” लढला आणि ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप घेऊन गेला, असे म्हणायची वेळ अहमदाबाद मधल्या वर्ल्ड कप फायनल सामन्याने आणली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला.
दीड लाख प्रेक्षकांच्यासमोर ऑस्ट्रेलियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्नांचा चुराडा केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला.
हेडच्या शतकाने स्टेडियमवर उपस्थित दीड लाख चाहत्यांची बोलती बंद केली होती.
वन-डे वर्ल्ड कपच्या सेमी फायनल आणि फायनलमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा ट्रॅव्हिस हेड हा चौथा खेळाडू ठरला. फायनलमध्ये शतक झळकावणारा ट्रेव्हिस हेड मॅन ऑफ द मॅच ठरला.
क्रिकेट वर्ल्ड कपच्या सलग 10 सामन्यांमध्ये विलक्षण प्रतिभा दाखवून खेळ केलेल्या भारतीय टीमला फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्माच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. ते पाहून 140 कोटी जनतेच्या डोळ्यातही अश्रू आले. भारताच्या पराभवामुळे संपूर्ण देशभर रविवारी रात्री शांतता पसरली होती.
पण याच पार्श्वभूमीवर भारतीय टीमच्या कामगिरीचे कौतुक
करत समस्त भारतीयांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांना ट्विट केले.
संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीमने अतिशय प्रतिभाशाली खेळ दाखवत विजयी वाटचाल चालू ठेवली होती. अत्यंत खिलाडू वृत्तीने तुम्ही सर्व सामने खेळलात आणि विजयीही झालात. भारताला तुम्ही गौरव मिळवून दिलात.
आम्ही सर्व भारतीय आज आणि सदैव भारत टीमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा विश्वास देणारे मेसेज सर्वत्र वाचायला मिळाले.
खेळ हा खेळ भावनेने अंगी घेतला जावा, खेळातील पराभव ही पत्काराला पाहिजे या भावनेने सर्वत्रच ऑस्ट्रेलियन टीमचे अभिनंदन करत भारतीय टीमचे देखील खास कौतुक करून त्यांच्या पाठीशी आपण ठाम उभे असल्याचा विश्वासही समस्त भारतवासीयांना दिला आहे.
१२ वर्षानंतरही भारताची वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा अपूर्ण राहिली. तर अश्या प्रकारे भारताला पराभूत करण्यात आल्यामुळे नुसतेच क्रिकेटर्स च नव्हे तर संपूर्ण भारतवासी चे डोळे पाणावले होते कारण की, अपेक्षांचं ओझं….! अजून काय?
रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211