मराठवाड्यातील लोहा तालुक्यातील टेळकी येथे लहान कुटुंबात जन्म घेतलेल्या एक अवलिया म्हणजेच ‘गोदा-मन्याड’ खोऱ्यातील पत्रकारांचा “अण्णा” साहेबराव सोनकांबळे होय.बाबुराव सोनकांबळे या बौद्ध समाजातील दांपत्याला 23 नोव्हेंबर 1977 रोजी मुलगा झाला.त्याचे नाव ठेवले ते साहेबच. तो आज लोहा स्थित विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय आणि मुद्रित माध्यमातून वृत्तपत्रात पत्रकार म्हणून परिचित असलेले म्हणजे साहेबराव सोनकांबळे होय.
लोह्यातच बालपणी जि.प.हायस्कूलमध्ये पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत ते पुढे या शहरात असलेल्या श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे ते पदव्युत्तर शिक्षणासाठी 1996 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे वृत्तपत्र विद्या आणि जन संवाद विषयात आपले पदुत्तर शिक्षण प्रा. सुरेश पुरी,प्रा. गव्हाणे आधी मार्गदर्शनाखाली आपले पत्रकारितेतील शिक्षण पूर्ण करत असताना त्यांचा एक वर्गमित्र आज मितीला खासदार म्हणून औरंगाबाद हा संभाजीनगरचे लोकप्रतिनिधित्व करत आहेत हे विशेष बाब,तर दुसरी वर्णन मैत्रीण खान ही आज तक या दूरचित्रवाहिणीची संपादकीचे विभागात वृत्त निवेदक म्हणून काम करत आहेत.
साहेबराव सोनकांबळे यांनी चार विषयात पदवीधर शिक्षण घेत माध्यम शास्त्र विषयात पि.एच. डी. साठी प्रवेश मिळवला होता. त्यांना या पदवी पासून वंचित ठेवले गेले हे त्यांचे दुर्भाग्यच म्हणहावे लागेल.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सलग 14 वर्षे समाजशास्त्र विषय शिकविण्याचे काम त्यांनी आपल्या अध्यापनातून केले आहे. वर्तपत्र आणि जनसंवाद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक ते प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे.
पत्रकारितेतील त्यांचा श्री गणेशा वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी सुरु केला.त्यांनी आपले पहिले मराठी साप्ताहिक ‘ग्रामीण दलित चौकशी’ सुरू केले त्याकाळात त्यांनी हस्तलिखित लिथ पेपरवर आपले मुद्रित माध्यमाचे कार्य सुरू ठेव.
माध्यमशास्त्रातील गुरुवर्य म्हणजे त्यांचे आई वडीलच वडिलांच्या सहवासातील दलित अत्याचार विषयी त्यांनी गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आपला वेळ सहज उपलब्ध करून देऊन तो समाजाच्या हितासाठी वापरला प्रथमतः त्यांनी 1992 मध्ये दैनिक विश्वमित्र 1994 ते 1996 पर्यंत दैनिक आपलं महानगर संपादक निखिल वागळे च्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादहून मराठवाडा विभागात पत्रकाराची भूमिका पार पाडली एका बातमी विषयी अब्रू नुकसानी प्रकरणात त्यांना कंधार न्यायालयात न्यायालयीन लढा द्यावा लागला त्यामध्ये त्यांनी न्यायालयाने निर्दोष मुक्तता करून त्यांना न्याय दिला यावेळी कंधार न्यायालयात निखिल वागळे यांना उपस्थित रहावे लागले हे विशेष बाब आहे. दैनिक सामनामध्ये 2006 ते 2020 पर्यंत त्यांनी सलग चौदा वर्ष पत्रकाराची भूमिका आपल्या बातमी लेखनातून लोहा शहर व परिसर यांच्या विविध बातम्या प्रसिद्धीस दिल्या सन २००६ मध्ये दैनिक सामनातून रिसनगावच्या शाळेतील 36 विद्यार्थी दहावी परीक्षेपासून वंचित या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी या वृत्ताची दखल घेत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बसण्याची संधी उपलब्ध करून दिली. ते विशेष असल्यास तरी दैनिक सामनाचे मुख्य संपादक तथा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या छत्रपती संभाजी नगरच्या आवृत्तीमध्ये आलेली बातमी “ग्रामीण भागातील कौलारू चे घरे नामशेष होण्याच्या मार्गावर…” ही बातमी वाचून ग्रामीण भागातील जीवनाचा अंदाज घेतला होता.
प्राचार्य साहेब अण्णा सोनकांबळे यांनी महाराष्ट्रातील लोककला ,लावणी ,तमाशाना आपल्या लेखणी द्वारे दैनिक सामनाच्या व्रत माध्यमातून प्रसिद्धी दिली. यावेळी रघुवीर खेडकर मंदा राणी खेडकर,भीमा भिका सांगवीकर,बडे आदी कलावंतासह मावशीची भूमिका करणारे कलावंत हास्यविनोदी कलावंत आदीच्या प्रकट मुलाखतीतून त्यांना दैनिक सामनातून न्याय मिळवून देण्याचे कार्य साहेबराव सोनकांबळे यांनी केला. या कलावंतांना या वृत्ताची दखल घेऊन राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे मानधन उपलब्ध करून देण्याचे धाडस आपल्या लेखणी द्वारे साहेबराव या पत्रकारांनी केली आहे. अशा या कर्तबगार,निस्वार्थ, निषप्रह, आणि संपादकाच्या वाढदिवसानिमित्त विपुल शुभेच्छा…!
विपुल बोंमनाळीकर,
कंधार 99 75 93 93 58