कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तनाला कंधार तालुक्यातील पेठवडज नगरीत नागरीकांचा भरभरून प्रतिसाद

 

 

नांदेड :कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तनाला कंधार तालुक्यातील पेठवडज नगरीत नागरीकांचा व भक्तां चा मोठा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे . पंचक्रोशीतील भक्तगण हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .

इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन आज करण्यात आले होते
समाजभूषण, शिक्षण सम्राट नारायण गायकवाड यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कौतुक वाटते अतिशय कमी कालावधीमध्ये कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून आजपर्यंत माझा या भागातील सर्वात मोठा जनसमुदाय बघायला मिळाला प्रत्येक जण जाण असणारा व प्रत्येकाला वेळ देणारा व रोजगार मिळवून देणारा पेठवडजच्या मातीतील हा पैलवान असे उद्गार इंदुरीकर महाराज यांनी काढले पेठवडजच्या सरपंच सौ.अनिता दत्ता गायकवाड यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य नारायण गायकवाड यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भूषण इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन मोठ्या दिमाखात पार पडल यावेळी प्रचंड जनसमुदाय व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *