एक दिवस अचानक मामी आणि माझा मामे भाऊ सोनालीच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन माझ्या घरी आले. मला वाटले सहज आल्या असतील .पण त्या मला आणि मिसेस ला तसेच पहिली स्वासिन म्हणून निमंत्रण देण्यासाठी आल्या होत्या.कारण आम्ही आणि मामी हे एकाच गावात राहत असल्यामुळे आमच्या आणि त्यांच्या घराचा सोनालीच्या जन्मापासूनच सहवास होता.
त्यामुळे सोनालीचे जन्मापासून ते आजपर्यंतचे आयुष्य संघर्षापासून ते आनंदापर्यंत कसे आले ते सांगितले तर डोळे पाण्याने डबडबून जातील.
कारण माझ्यासमोर सोनाली हसली,बागडली ,दादा म्हणून अनेकवेळा भांडली ,अन् गाडीवर चकर हे सगळे प्रकार मला आठवत होते.आज सोनालीला हळद लावत असताना मन खूप गहिवरून आले. पण रडताही येत नव्हते. कारण ती तिच्या वडिलांना’ नाना ‘म्हणत असे ! आज सगळीकडे आनंदाचे वातावरण होते .दारात फुले सजलेली होती.
सगळीकडे रांगोळी बाहेर वाजंत्री वाजत होती. हळदीचा मंडप पूर्ण फुलांनी सजलेला होता .पण त्यामध्ये माझा मामा दिसत नव्हता. अर्थात सोनाली चे वडील म्हणजे’ नाना’! त्याचवेळेस बाजूला हळदीची गाणी ,त्यांच्या वर्गातील मैत्रिणी, बहीण, भाऊ, मामा, मामी ,मावशी सगळे काही सोनालीचा कौतुक सोहळा डोळ्याने पाहत होते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि सोनालीला हळद लागतात सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू पडत होते.
सोनालीला उन लागू नये म्हणून आभाळही ढगांनी भरून आले होते. कारण तिला तिचे वडील वरून उभा टाकले की काय?असा भास होत होता.नाना, पहा ना! केवढा आनंदाचा सोहळा तुमच्याशिवाय अनाथ असलेली माझी आई ,आम्ही सहा भावंड कशी सांभाळली असेल हो आम्हाला ! नाना माझे लाड आईने खूप पुरवले ,माझा भाऊ लहान असो तो पुढे होऊन सगळे करतो. माझे सगळे स्वप्न पूर्ण होतीलही पण तुम्ही नाहीत.नाना ……निदान आशीर्वाद तरी द्या!आज तुमच्या फोटो समोर नतमस्तक होताना खरंच खूप आठवण होत होती.कारण बापाचा हात मुलीच्या डोक्यावर असावा म्हणतात……..नाना आज दादा आणि वहिनींनी हळद लावली पण……..आपला आवाज यावेळी माझ्या कानावर असता तर …..बाबा कसे सांगू तुम्हाला……मन घट्ट करून….मी माझ्या अश्रूंना सावरत आहे.असो…
ओंकार लव्हेकर,
..