शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी कंधार येथे मुख्याध्यापकांना केले आगामी परीक्षा व युडायस प्लस प्रणालीवर मार्गदर्शन

 

कंधार;(दिगांबर वाघमारे )

केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना होण्यासाठी आता यु-डायस प्लस प्रणाली मध्ये शिक्षकांची व शाळेची आणि विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करावी त्यावर येणाऱ्या शैक्षणिक आगामी वर्षात संच मान्यता , शालेय पाठ्यपुस्तके व अन्य बाबी मिळणार असल्याने कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी या कामात हयगय न करता स्वतः लक्ष घालून देवून काम करावे तसेच आगामी परीक्षेच्या तयारीसाठी दहावी बारावी परीक्षा केंद्रावर कॉपीला आळा घालून गुणवत्ता वाढीसाठी लक्ष देण्याची आवाहन नांदेड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी कंधार येथे दिनांक 15 डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ पब्लिक स्कूल बाळांतवाडी येथे आयोजित बैठकीत केले . गट शिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी प्रशांत दिग्रसकर यांचा पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार केला .

यावेळी कंधार तालुक्यातील सर्वच शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते , माझी सुंदर शाळा , इन्स्पायर अवार्ड यासह सरल प्रणाली अद्यावत करण्यासाठी युडायस प्लसवर काम करावे यासह स्वच्छता मॉनिटर बद्दलची माहिती दिली . तसेच जिल्हा विज्ञान प्रदर्शन सगरोळी येथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे , अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आदेश सुटणार आहेत सर्व मुख्याध्यापकांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्याच्या सूचना दिल्या .

चावेळी श्री संजय येरमे
गटशिक्षणाधिकारी पं.स. कंधार यांनी आभार मानले . शिक्षणविस्तार अधिकारी आगलावे पाटील , कंधार केंद्रप्रमुख माधव कांबळे , जयवंत काळे
केंद्रप्रमुख-उस्मान नगर , वाघमारे एन एम
केंद्रप्रमुख , दिनकर संतोष
केंद्रप्रमुख – कौठा , उद्धव सूर्यवंशी
केंद्रप्रमुख – पानभोसी , आनंद तपासे , गणेश थोटे आदीसह सर्व मुख्याध्यापकांची उपस्थिती होती .

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *