Post Views: 134
वर्षेभर अनेक सण साजरे होतात आणि निघून जातात परंतु वर्षांतून एक आगळा-वेगळा सण म्हणजे मकर संक्रांत या सणामध्ये तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला हा महत्वपूर्ण संदेश असतो. आणि माणसातील वाद मिटवण्यासाठी या सणाच्या माध्यमातून उपयोग सुध्दा केला जातो. परंतु आजकाल माणसं जुन्या परंपरा ह्या विसरून जात आहेत.
पहिलं माणसं अनेकांच्या घरी जाऊन वडीलधाऱ्या माणसांना तिळगुळ देऊन त्यांना नतमस्तक होत गेले. आज ती परंपरा मोडीला जात असल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळत आहे. या ऑनलाईन जगात व्हाट्सएपच्या, फेसबुकच्या, टेलिग्रामच्या, इंस्टाग्रामच्या, माध्यमातून अनेकांना मोठं-मोठ्या तिळ गुळाचे टोपले पाठवून सण साजरे करताना दिसत आहेत. या ऑनलाईन कारभारामुळे खरंच माणसातला माणूस सुध्दा हरवल्यासारखा जाणवतं आहे.
पहिलं तिळगुळ देताना आणि घेताना अनेकांना सुखं आणि दुःख विचारत होते. आज मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त गोड-गोड ऑनलाईन बोलणं आणि हा दिवस संपला की, नेहमीप्रमाणे अनेकांना नाव ठेवणे, अनेकांना दोष देणे, अनेकांची बदनामी करणे, अनेकांना खोटे आश्वासन देणे, अनेकांची दिशा भूल करणे अश्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळत असतात.
जीवन जगत असताना अनेक गोष्टींचा सामना करून जीवन जगावं लागत. आणि अनेकांसोबत चांगल्याप्रकारे सुध्दा वागावं लागत. तरच आपल्याला जगण्याचा खरा आनंद मिळू शकतो. फक्त सणापुरते जवळ घेऊन चालणार नाही. तर अनेकांच्या मनात राहून चांगली जागा सुद्धा निर्माण करावी लागते. मग रोजच माणसाच्या आयुष्यात गोडवा कायमस्वरूपी टिकवून राहण्यासाठी मदत होईल.
पण काळ बदलला आणि त्या बदलत्या काळाबरोबर हल्ली आपण आपल्या सण-उत्सव साजरे करण्याच्या परंपरा ही नकळतपणे बदलत चाललो आहोत. त्यामागील उद्देश सगळे काही विसरलो. आज संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळाचे चित्र असलेले मेसेज एकमेकांना पाठवतो. त्यामुळे व्हाट्सअप वर फक्त तिळगुळ पहायला मिळतात, पण प्रत्यक्ष हातामध्ये मात्र एकही तिळगुळ नसतो. कारण आपल्या जवळच्या माणसांना एक मॅसेज पाठवला की आपली जबाबदारी संपली. या विचारामुळे ह्या सणात फक्त औपचारिकता उरलेली दिसून येते. म्हणून असा मनात प्रश्न निर्माण होतो की, ऑनलाईन तिळगुळ मिळाले का ?
लेखक
– युवा साहित्यिक, सोनू दरेगावकर
: संपर्क:
📲 क्र.7507161537