माळाकोळी ; एकनाथ तिडके
माळाकोळी येथील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले शूर कुटुंबीयांनी या वर्षापासून विश्वकर्मा सेवा संघाच्या माध्यमातून दिवंगत वडील प्रसिद्ध शिल्पकार सोपानकाका शूर यांच्या स्मरणार्थ समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे,यासाठी त्यांनी या वर्षी दोन गुणवंत व गरजू विद्यार्थिनींची निवड केली आहे नुकताच एका छोटेखानी कार्यक्रमात सदर विद्यार्थिनींना प्रत्येकी अकरा हजार रुपये शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले.
माळाकोळी येथील प्रसिद्ध शिल्पकार गुरुवर्य सोपान काका शिरूर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अभियंता ज्ञानेश्वर शूर व शिल्पकार मोहन काका शूर या भावांनी इतर कर्मकांडावर पैसे खर्च न करता समाजातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय घेत एक चांगला पायंडा पडला आहे.
आपल्या दिवंगत वडिलांच्या नावे समाजातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा स्तुत्य उपक्रम या वर्षीपासून सुरू केला आहे , याची सुरुवात करत असताना त्यांनी दोन गुणवंत व गरजू विद्यार्थिनींची निवड केली यामध्ये कु. तेजस्विनी मष्णाजी पांचाळ इयत्ता दहावी मुखेड ,व कु. वैभवी गोवर्धन सुने पवार इयत्ता बारावी देगलूर या विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला ,एका छोटेखानी कार्यक्रमात प्रत्येकी अकरा हजार रुपये शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले .
यावेळी श्रीमती राजाबाई सोपान काका शूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमाकांत पांचाळ, अभियंता ज्ञानेश्वर शूर, प्रा.माधव कागणे, मोहन काका शूर व विश्वकर्मा सेवा संघाचे पदाधिकारी व मित्र मंडळ उपस्थित होते. या अगोदरही शूर कुटुंबीयांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व गरीब कुटुंबांना वैद्यकीय कारणासाठी सुद्धा मदत केलेली आहे.