प्रत्येक उंबरठ्यावर हृदयरोग -डॉ. गौरव पुंडे..! मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचा तपपूर्ती सोहळा: गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार अस्थिरोग तज्ञ डॉ. त्र्यंबक दापकेकर यांना प्रदान

 

मुखेड: प्रतिनिधी

कोविड नंतर जणू हृदय रोगाची लाटच आली आहे हृदयरोगाला वयाची अट राहिली नाही. असंख्य लोक हृदयरोगाने मृत्यू पावत. प्रत्येक उंबरठ्यावर हृदयरोग आलेला आहे असे प्रतिपादन ग्लोबलचे इंटरव्हेशनल कॉर्डियॉलॉजिस्ट डॉ. गौरव पुंडे यांनी केले.
ते मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचा तपपूर्ती सोहळा व्याख्यानमालेचे पुष्प गुंपताना ‘हृदयरोगाची कारणे, उपचार- लक्षणे प्रतिबंध, सी पी आर, जीवन संजीवनी’ (प्रात्यक्षिकांसह) या विषयावर बोलत होते.

तपपूर्ती व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर गुरुवर्य नामदेव महाराज दापकेकर व्याख्याते जेष्ठ फिजिशियन डॉ. अनंत सूर्यवंशी, इमाचे अध्यक्ष अशोक कौरवार, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष रामराव श्रीरामे, एडवोकेट बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, प्राचार्य हरिदास राठोड, डॉ. विद्याधर भेदे, गंगाधरराव दापकेकर, श्रीमती विजयाताई देशपांडे (अम्मा), नंदकुमार मेगदे, व्याख्यानमालेचे आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

हृदयरोगाची मूख्य लक्षणे काय आहेत हे सांगताना डॉ.गौरव पुंडे पुढे म्हणाले की, छातीत दाटून येणे, वेदना आणि अस्वस्थता धाप लागणे, छातीत दुखणे, मान-पाठ आणि ओटीपोटापर्यंत वाढत जाणे, धाप लागणे, बधिरता, हात आणि पायात अशक्तपणा येणे इ. होय. यासाठी रुग्णांनी घाबरून न जाता जवळचे रुग्णालय गाठावे,आजच्या काळात, हृदयरोग हा मृत्यू होण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे आणि त्यात, कोरोनरी आर्टरी (रक्तवाहिनी) रोग आणि जन्मजात हृदय रोग यांचा समावेश आहे.

जगभरात हृदय विकाराचा झटका आणि हार्ट फेल होणे हे हृदयरोगाच्या प्रकारांपैकी दोन सामान्य प्रकार आहेत असाही सल्ला डॉ. गौरव पुंडे यांनी दिला. स्लाईडशोच्या माध्यमातून विविध लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार विषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करताना आमदार डॉ. तुषार राठोड म्हणाली की, तपपुर्ती व्याख्यानमालेचा हृदयरोगाशी संबंधित निवडलेला विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हृदय रोगाची लक्षणे दिसतात रुग्णांनी अंगावर न काढता तात्काळ रुग्णालय गाठणे आवश्यक आहे. यावेळी जेष्ठ फिजिशियन डॉ. आनंत सूर्यवंशी यांनी जीवन संजीवनी विषयी माहिती दिली व ते म्हणाले की,रुग्ण बेशुद्ध असताना मदत करणाऱ्या लोकांनी काय केले पाहिजे याची प्रात्यक्षिके दाखवले. स्लाईट शोद्वारे जीवन संजीवनी मार्गदर्शन करताना त्यांनी स्टेप बाय स्टेप आपण काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती दिली. ब्रेण्डेड पेशंट काय असतो यावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

 

यावेळी गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ तथा ग्लोबल हॉस्पिटल नांदेडचे संचालक डॉ. त्र्यंबक दापकेकर यांना रोख 11 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला आयोजक मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी करताना व्याख्यानमाला आयोजनामागची भूमिका विशद करत उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी डॉ. अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. त्र्यंबक दापकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. दिलीप पुंडे, सौ.माला पुंडे, संजय पुंडे, सौ. तेजस्विनी गौरव पुंडे यांनी स्वागत केले.

मानपत्राचे वाचन ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी आंबुुलगेकर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सौ. तेजस्विनी पुंडे, एकनाथ डुमणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले तर आभार दादाराव आगलावे यांनी मानले. यावेळी अभियंता अरविंद चिटमलवार यांचा भिमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. व्याख्यानमालेत पत्रकार, डॉक्टर, वकील, साहित्यिक, जिप्सी मॉर्निंग ग्रुप, सुप्रभात मित्र मंडळ, मायबोली, संजीवनी सकाळ, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सेवेकरी, वैद्यकीय संस्थेचे सदस्य, इमाचे सदस्य, विविध संघटनांचे सदस्य, व्यापारी, महिला, शिक्षक, प्राध्यापक, नांदेड, मुखेड, जांब, देगलूर, कंधार, व परिसरातील असंख्य श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यानमालीची सुरुवात वंदे मातरम गीताने झाली तर पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर हृदय रोगाची लक्षणे व उपाय यांचे पत्रके वाटण्यात आली. यावेळी उपस्थित श्रोत्यांनी असंख्य ग्रंथांची खरेदी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमाई व्याख्यानमाला संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *