काल ग्राउंडवर रनींग करुन बाजूच्या कठड्यावर जाऊन बसले.. मी कुठेही बसले तर ते फक्त बसणं नसतं तर निरीक्षण करण्यासाठी घेतलेला तो ब्रेक असतो.. जसा गाडीला ब्रेक गरजेचा असतो तसा प्रेमाला ब्रेक हवा का ??.. हा माझाच मला पडलेला प्रश्न आणि उत्तरही मलाच मिळालं ते म्हणजे नको रे.. आणि हवं रे..
थोडा विसावा आणि थोडं निरीक्षण करुन झाल्यावर मी बाजूच्या फरश्यांवरुन चालायला लागले तेव्हा लक्ष गेलं ते तरुण जोडप्याकडे.. साधारणपणे ७० च्या पुढेच असावेत..
हॅंडसम त्यांच्या देखण्या बायकोला म्हणत होते , अगं स्वरा ( कदाचित नात , मुलगी , सुन ) बोलताना ऐकलं , उद्या रोज डे आहे म्हणे.. आपण कधी हे दिवस साजरे केले नाहीत पण तिचं फोनवरचं बोलणं ऐकल्यावर वाटलं, तुला याबद्दल काय वाटतं विचारावं.. मी कधीही तुला सरप्राईज गिफ्ट दिलं नाही , चोरुन एक दोन वेळा गजरा मात्र दिला होता.. सांग ना आता तुला काय गिफ्ट देउ ??.. त्यावर काहीही न बोलता सुंदरी एकदम गप्प .. पाणीपुरीच्य पुरीसारखे तिचे गाल फुगलेले… बहुधा त्या हॅंडसम चा तिला राग आलेला असावा.. काय गं बोल कीं , काय झालं ??
त्यावर सुंदरी म्हणाली , तुम्ही गुलाब द्याल हो , पण त्याला असलेले काटे जरी टोचले ना तरीही ते जाणवण्याची संवेदना आता माझ्यात शिल्लक राहिली नाही.. जिथे संवेदना नाही तिथे वेदना कुठून होणार आणि बोटावर रक्त येइल का नाही हेही माहीत नाही कारण ते सगळं कुटुंबाचं करताना आटलय.. हे वाक्य कानावर पडलं आणि माझ्यातील संवेदन मनाची लेखिका ग्राउंडवरच अश्रू लपवुन रडु लागली.. त्यावेळी जाणवलं की , आमची पिढी खरच नशीबवान आहे कारण आम्हाला संवेदना आणि वेदना दोन्ही अनुभवता आल्या .. आमच्या आधीची पिढी सगळ्यांचं सगळं करत राहिली आणि स्वतःसाठी वेळ द्यायला विसरली.. तरुण वय निघुन जातं आणि म्हातारपणी कितीही वाटलं तरीही शरीर साथ देत नाही.. मन तयार होत नाही..
परदेशात साजरे केले जाणारे दिवस म्हणुन आपण त्याच्याकडे पहातो पण प्रेम देशात परदेशात सगळीकडे एकच आहे ना.. तिथला पिझ्झा बर्गर आपण सहज पचवतो मग भावना सगळीकडे सारख्याच ना.. त्या योग्य वेळी व्यक्त व्हायलाच हव्यात .. नाहीतर काटे बोथट होतात आणि पाकळ्या कोमेजुन जातात.. आपल्याला गुलकंद करायला गावठी गुलाब लागतो मान्य आहे पण प्रेम व्यक्त करायला विदेशी गुलाब का चालु नये ??… मग ती राणी रुसली का असेना काट्याने काटा न काढता तिला मुकाट्याने गुलाब द्या आणि प्रेम व्यक्त करा..
प्रेम व्यक्त करायला
गुलाबीही चालेल रोझ
कशीही कुठेही चालेल
तु फक्त भेट रोज..
उद्या रोझ डे आहे.. नवरा बायको , प्रियकर प्रेयसी , मित्र मैत्रीण कोणीही एकमेकांना गुलाब देउन प्रेम व्यक्त करुच शकतात..
गुलाबी दिनाच्या गुलाबी शुभेच्छा..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi