कंधार (प्रतिनीधी – संतोष कांबळे )
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक येथील नगर पालिकेच्या जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे.हा पुतळा राज्यमार्गावर दर्शनी भागात आला पाहिजे यासाठी मातंग समाज गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहे.महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पासुन जाणारा हा राज्य महामार्ग आहे.या रस्त्यावरील शाॅपिग सेंटर न.पा.च्या मोकळ्या जागेत बांधून हा रस्ता शंभर फुटाचा करा व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आना अशी मागणी आहे.या मागणीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
असे असतानाही सत्तेतील राजकीय नेते तथाकथित समाजाच्या नेत्यांना हाताशी धरून मुळ मागणी बाजुला ठेवून पुतळा स्थलांतरित करण्याचा कट रचत आहेत हे कदापी सकल मातंग समाजाला मान्य नसुन हा पुतळा त्याच ठिकाणी दर्शनीय भागात आणावा . मातंग समाज अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थलांतरित करु देणार नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता करुन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात आणावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून विविध प्रकारचे आंदोलने चालू आहेत.या विषयाला गांभीर्याने घेऊन जिल्हाधिकारी यांना महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत रस्ता शंभर फुटाचा करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले असून त्या पध्दतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद विभाग कामाला लागले आहेत.हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा असुन अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा राज्य महामार्गावर राहु नये यासाठी काही राजकीय नेते कट रचत आहेत.मातंग समाजाची जी मुळ मागणी होती त्या मागणीला बगल देत दुसऱ्याच ठिकाणी जागा देवुन समाजात फुट पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत.
तत्कालीन तहसीलदार तथा मुख्याधिकारी यांनी तहसील कार्यालयाच्या समोर 1500स्केअर फुट जागा देत असल्याचे पत्र दिले असुन नमुना 43 उतारांवर 800 स्क्वेअर फुटच जागेची नोंद करण्यात आली असल्याने भविष्यात प्रशासन व समाजात वाद निर्माण करण्याचा उद्देश आहे.त्यामुळे सदरील देण्यात आलेली जागाच मातंग समाजाला मान्य नाही.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा राज्य महामार्गावर राहिला पाहिजे यासाठी प्रशासनाने कोणत्याही जागेचे अमिष न देता महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता करून शॉपिंग सेंटर पाठीमागे बांधुन अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात आणावा.या ठिकाणाहून पुतळा इतर जागेत स्थलांतर करु नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर बालाजी कांबळे, महेंद्र कांबळे, प्रा. पांडुरंग वाघमारे,अँड. सचिन कांबळे,निलेश मोरे,पद्मभूषण जाधव, दिग्विजय दिग्रसकर, अभिजीत शिरशीकर, माधव गायकवाड,प्रदीप इंगळे, श्याम गडंबे,शेषराव मळगे, शंकर मोरे,प्रा.माधव जाधव सर,भगवान कांबळे,प्रभाकर वाघमारे,गंगाधर सूर्यवंशी,किरण गोटे,मच्छिंद्र देवकांबळे,रामचंद्र कांबळे,नामदेव कांबळे,राजेश गडंबे,
पंडित देवकांबळे,बापूराव वाघमारे, मालोजी वाघमारे, माधव शेकापूरकर,बाबुराव टोम्पे, चंद्रकांत गऊळकर,पोचीराम वाघमारे, गोविंद सूर्यवंशी, साहेबराव घोडजकर,संजय कांबळे, शशिकांत सूर्यवंशी,कैलास कांबळे,गजानन कपाळे,राम कांबळे,लक्ष्मीकांत कांबळे, उद्धव वाघमारे,संतोष कांबळे, रवी कांबळे,विकास कांबळे,विकास संदीप, गडंबे गायकवाड,साईनाथ गायकवाड, धम्मदीप गायकवाड, दत्ता धर्मेकर,विलास भिसे, मोनित गायकवाड,संभाजी फुले, संदीप देवकांबळे, ऋषिकेश वाघमारे,अभिजीत कांबळे,महेश कांबळे,पराक्रम कांबळे,आकाश गडंबे,तुळशीराम कांबळे,उत्तम नवघरे,आकाश मोरे, राहुल घोडजकर, यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.