विषबाधित रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या ;आमदार शामसुंदर शिंदे
लोहा ;प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या कार्यक्रमात एकादशीच्या दिवसी भगर व आमटी खाल्याने जवळपास दीड ते दोन हजार भाविक भक्तांना विषबाधा झाल्याची दुर्देवी घटना दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली होती, विषबाधित हजारो रुग्णांना लोहा उपजिल्हा रुग्णालय, अहमदपूर शासकीय रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णुपुरी, पालम शासकीय रुग्णालय, सावरगाव आरोग्य केंद्र व खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी विषबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले होते,
काल दि. 8 फेब्रु गुरुवारी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी विषबाधित रुग्णांची डॉ. शंकराव चव्हाण विष्णुपुरी रुग्णालय, लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्र, व कोष्टवाडी येथील आरोग्य कॅम्प येथे भेट घेऊन विषबाधित रुग्णांना व नातेवाईकांना धीर दिला व अस्तेवायीकपणे विचारपूस केली व लोहा उपजिल्हा रुग्णालय येथे व सावरगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल विषबाधित रुग्णांची आमदार शामसुंदर शिंदे यांनी भेट घेऊन अस्तवाईकपणे विचारपूस केली व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विषबाधित रुग्णांना वेळेवर व दर्जेदार औषध उपचार करण्यासाठी आमदार शामसुंदर शिंदे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले,विष बाधित रुग्णांच्या वैद्यकीय सेवेत कसूर करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची कदापि गय केली जाणार नसून विष बाधित रुग्णांनी व नातेवाईकांना काही अडचणी झाल्यास न घाबरता मला कधीही फोन करा मी विषबाधित रुग्णांच्या अडी अडचणीचे निरासन करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी विषबाधित रुग्णांना व नातेवाईकांना आश्वासन देऊन धीर दिला,
यावेळी डॉ. शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. निळकंठ भोसीकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती लोह्याचे संचालक चंद्रसेन पाटील, खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार ,डॉ. संजय पेरके, डॉ. विद्या बापट, डॉ. भालेराव मॅडम, डॉ. सोमेश मारावार, नायब तहसीलदार अशोक मोकले, मंडळ अधिकारी शेख, तलाठी पुजा गाडे, शेकापचे तालुकाध्यक्ष नागेश हिलाल, संचालक सुधाकर सातपुते, जगदीश पाटील कदम सह वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधित सर्व रुग्णांची तब्येत स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे व विषबाधित सर्व रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना सांगितले.