नांदेड : मौजे कोटेकलूर ग्रामपंचायत हद्दीतील जागा प्लॉट क्र-१७१ खरेदी खत रजिस्ट्रि केली असून गेल्या तीन वर्षापासून नमुना नं.८ अ रजिस्टरला नोंद घेण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत दि.०६.०२.२०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.वेळोवेळी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे पत्रव्यवहार करून देखील
ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मारोती पेदापूरे यांनी कोटेकलूर ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता क्र-१७१ जागा (प्लॉट) ६६ X ५१ फुट खरेदीखत (रजिस्ट्रि) केले असून सौ.पार्वती शिवाजी पेदापुरे यांच्या नावे केले आहे
सदर नोंद करण्यासंदर्भात विनंती अर्ज ग्रामसेवक,सरपंच यांच्याकडे सातत्याने पाच वेळा देवून सुध्दा खरेदीखत नं.८ अ ला नोंद घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आजपर्यंत ब-याच वेळा आपल्याकडे विनंती अर्ज देवूनसुध्दा मला कोणत्याही प्रकारचा न्याय देण्यात आलेला नाही. दिनांक १३.०६.२०२३ रोजी आत्मदहनाचा अर्ज दिलेला असतांना मला काही खोटे आश्वासने देवून मला तो आत्मदहनाचा अर्ज माघार घेण्यास मजबूर करण्यात आले आणि कोणताही ठोस न्याय दिला नाही.
तसेच दिनांक ३०.०१.२०२४ रोजी मासीक सभेत सर्वासमोर संविधानाचे सर्व नियम गटविकास अधिकारी यांचे सुनावणी अहवाल यांचे वाचन करून दाखवले असतांना सुध्दा आमचे पद गेले तरी चालेल परंतु नमुना नं.८-अ ला रजिस्टर नोंद घेवू देत नाहीत असे सांगत पाच ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. याचे मुख्य कारण मी त्यांच्या विरोधी पक्षाचा सदस्य आहे, म्हणून जाणीवपूर्वक टाळाटाळ, विरोध करत आहेत. मी एक मेंढपाळ व्यवसायी असून माझ्याविरोधात असल्यामुळे मला जाणीवपुर्वक त्रास देत आहेत.
म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोस निर्णय होवून न्याय मिळेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार आहे आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस असून मला तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी उपोषणार्थी पेदापुरे शिवाजी मारोती यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.