व्हॅलेंटाईन डे… Velentineday

 

Love is so Beautiful & Easy म्हणत फेब्रुवारीचं दमदार स्वागत केलं जातं. प्रेमाची हवा आसमंतात दरवळत असल्याचे भासते. तरूणाईच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आल्यामुळे प्रत्येक दिवसाचं सेलिब्रेशन नव्या कल्पकतेसह नव्या ढंगात केलं जातं. फेब्रुवारी महिन्याची उत्सुकता ही केवळ व्हॅलेंटाईन डे साठी अनेकांना असते. गालावर हास्याची कळी उमलवणाऱ्या, खूप दिवस मनात साठवून राहिलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी, विविध प्रेममय डेजच्या रंगात रंगून जाण्यासाठी तरुणाईच्या आनंदाला पारावरच उरलेला नसतो. प्रेम म्हणजे काय? असं विचारलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, प्रेमात लाॅजिक नसतं मॅजिक असतं असं उत्तर आता सर्वत्र झालंय.
प्रेमाची प्रकर्षाने आठवण होते ती व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने. रोज देऊन प्रपोज करून नात्याची सुरुवात करायची नंतर चॉकलेट, टेडी यासारखे गीफ्ट देऊन नातं फुलवून प्रॉमिस करायचं. किस आणि मिठी मारत प्रेमाच्या दोन पायऱ्या चढत आनंदात आपला व्हॅलेंटाईन डे…साजरा करायचा. मात्र त्यानंतर
स्लॅप, किक, फ्लर्टिंग, कन्फेशन आणि मिस करत शेवटी ब्रेकअपने रंगीन, प्रेममय फेब्रुवारीतील आठवड्याची सांगता करायची. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय… सगळ्यांशीच फ्लर्ट करायचं असा सध्याच्या प्रेमाचा नवा फंडा. हल्ली ब्रेकअपची पण जोरदार पार्टी दिली जाते. रिलेशनशीपचं स्टेट्सबद्दल अगदी बिनधास्तपणे आजची तरुणाई व्यक्त होते.
खरं सांगायचं तर प्रेम अशी भावना आहे की ते व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीची म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची खास वाट बघण्याची गरज नाही. पण त्यातही एक वेगळी गंमत अनुभवायला आणि रोजच्या रूटीनमधून बाहेर येऊन हलकं फुलकं होऊन मजा करायला हे डेज साजरे करायला देखील काहीच हरकत नाही. रोजचाच दिवस प्रेमाचा आहे असं समजून जगलं तर जगायलाही नक्कीच मजा येईल. सध्याचा प्रेमात दिखावा जास्त असतो.

रूचिरा बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *