स्त्रीयात्त्वाची साखळी

ती एक नैसर्गीक प्राकृती…
हलती, बोलती, चालती आकृती
म्हणजे स्त्री…
पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसं जग आधुनिक होत गेलं तसं तसं स्त्रियासुद्धा आधुनिक विचारांच्या होतं गेल्या. आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर कार्य करीत  आहेत त्यानुषंगाने घरातील बंधने त्यांच्या वरील सेल होताना दिसत आहेत .
  आज पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या  मोठा पदावर कार्यरत असून ..जे कार्य पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी दाखवत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये महिलां कंबर कसून  कार्यरत आहेत.
उदा: संरक्षण क्षेत्र, विमान, रेल्वे वाहतूक क्षेत्र, अंतराळायीन क्षेत्र, न्यायालयीन क्षेत्र अश्या अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्रे याचबरोबर शेती-ग्रहउद्योग अशी बरीच क्षेत्रे आज महिलांनीकाबिज केली आहेत. व त्यात स्त्रिया अतुलनीय अशी प्रगती ही करीत आहे. 
आजच्या घडीला पाहता महिला व मुली या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीयां वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हत्या, शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वर बंधने घातली जात होती. परंतु आजचे चित्र बदलले आहे.
भारतात आज 80 टक्के स्त्रिया हा स्वातंत्र्य काळात नंतर  सुशिक्षित झाल्या आहेत. आजकाल प्रत्येक पालक आपल्या मुलीला शाळेत पाठण्यासाठी व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी
पुढाकार घेत आहे. 
आजची स्त्री ही आधुनिक विचारसरणीची आहे. जिथे महिलांवर अन्याय होतो तिथे आवाज उठवणारी आहे .ऐवढेच नाही तर प्रत्येक महिला ही त्यांची परिधन करायची वस्त्र आणि गरज 
ही ओळखुन आहे. तसेच  लग्न जुळताना करण्यात येणार्या विचारांवर सुद्धा आधुनिक झाल्या आहेत. 
महिलांवर होणार्या अत्याचाराचा विचार करता आज कायदा व सुव्यवस्था त्याच्या पाठशी आहे. त्यामुळे अत्याचारावर त्या ठामपणे बोलताना दिसत आहेत .याचबरोबर महिला संरक्षण कायदा किंवा महिला आरक्षण या विषयावर त्या लढाई देताना दिसत आहेत . 
आज महिला घरातील बंधने झुगारून देत आहेत.  ज्या महिला चूल आणि मूल एवढ्यावरच होत्या ते आज अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. स्त्रिया संबंधित कुठलाही इतिहास काढून पाहिल्यास असे कळते की कुठल्याही कार्यास त्यांनी हात लावल्यास ते त्याचं यशस्वीच झालेले दिसून येते…त्याग, समर्पण, बलिदान यात ही त्या मागे नाहीत.
 “स्त्री हा समाजाचा मूलभूत घटक… नवी पिढी घडवणारी, कुटुंबव्यवस्थेला आकार देणारी, घराघरात सुसंवाद राखणारी… समाजात स्त्रीचं स्थान जितकं महत्त्वाचं, आदराचं, तितकाच तो समाज सभ्य, सुसंस्कृत. समजला जातो…
 मुलगी, बहीण, मैत्रीण, आई, पत्नी वा अन्य जिव्हाळ्याची ही नाती स्त्रियांमुळे जोपासली जातात.. स्त्रीमुळे नातेसंबंधात एक वेगळीच मृदुता, जिव्हाळा, माया, प्रेम उत्पन्न होते. स्त्रियांमध्ये
 खरी आत्मनिर्भरता येते ती आंतरिक बदलातून, वैचारिक आणि आध्यात्मिक परिवर्तनातून, शास्त्रीय ज्ञानातून, निकोप  शरीरस्वास्थ्यातून आणि तर्कशुद्ध विचारसरणीतून… केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही आत्मनिर्भर होऊन आपला व्यक्तिमत्वविकास कसा साधावा…हा बदल स्त्रियां मुळेच शक्य आहे.
आजच्या युगात स्त्रीयाने मोठी प्रगती केली असली तरी, कुठे तरी त्यांच्या मनात इतरांविषयी ईर्षा, द्वेश,मत्सर आणि तिरस्कार अजून ही घर करून उरलेलं आहे.
तो भाव जोपर्यंत बंद होत नाही… तो पर्यंत प्रत्येक स्त्री ही दुसर्या स्त्री ची वैरी राहणार आहे. त्यामुळें एकमेकास साह्य करून स्त्रियां च्या आत्मनिर्भर व आत्मसम्मान ची साखळी बनूया…बस एवढंच…
माझ्या सर्व सखीनां महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
रूचिरा बेटकर,नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *