कंधार : प्रतिनिधी
दि.०९/०३/२०२४ रोजी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मौ. कंधारेवाडी ता. कंधार येथे, गावातील डॉ. दिलीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील प्राध्यापक डॉ.रज्जाक कासार यांनी वरील उद्गार काढले.
जेंव्हा डिग्री घेऊन बाहेर पडता त्यावेळी, खेड्या पाड्यातील अशिक्षीत नाहीरे वाल्याना ज्ञान देतांना न्यायदेवतेच्या मंदिरातील पुजारी म्हणून न्याय दिले पाहिजे असे आपल्या भाषणात प्रमुख मार्गदर्शन करतांना डॉ. रज्जाक कासार यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीरामे हे होते. तर डॉ. दिलीप सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात, भाई केशवराव धोंडगें यांच्या कॉलेज काढण्यामागचा उद्देश सांगितला.
या कार्यक्रमासाठी माजी सरपंच आयनाथ पा. कंधारे विधार्थी स्वयंसेवक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकमाचे सुत्रसंचलन डॉ. पी. एल डोम्पले यांनी केले तर आभार सुनिल आंबटवाड यांनी मानले.