निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची! – अरुणा संगेवार

 

 

साडेचार हजार ज्येष्ठांसह तीन लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क!..
—————————————-

(कंधार: विश्वंभर बसवंते )

निवडणूक काळामध्ये आदर्श आचारसंहितेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे पत्रकार परिषदेत कंधारच्या उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी बोलून दाखवले आहे.
आगामी होणाऱ्या २०२४ च्या १९ व्या लोकसभा निवडणुकीसाठी लोहा-कंधार विधानसभा मतदार संघातील ३३० मतदान केंद्रावर घेण्यात येणाऱ्या मतदानासाठी ४ हजार ६४१ ज्येष्ठ मतदारांसह २ लाख ९२ हजार ५८५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.होवू घातलेल्या निवडणुकी दरम्यान नियोजित मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरविणार असल्याची महिती दि.१७ मार्च २०२४ रोज रविवारी कंधार तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्या आयोजित बैठकीत उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार यांनी दिली.

लातूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच दि.७ मे २०२४ रोजी होणार असून, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभे अंतर्गत आहे.या विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ३१३ तर महिला मतदार १ लाख ४१ हजार २६६ असे २ लाख ९२ हजार ५८५ एकूण मतदारांची आज घडीला नोंद आहे.

 

एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचीत राहणार नाही यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.त्यासाठी या मतदार संघातील २ हजार ४१४ दिव्यांग मतदार व ४ हजार ६४१ ज्येष्ठ नागरीक (८५ वर्षांपेक्षा जास्त) यांच्यासाठी त्यांच्या घरी जावून पोस्टल मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.कंधार व लोहा तालुक्यातील ३३० बुथसाठी १९५१ कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आल्याची माहितीही यावेळी दिली.

लोहा – कंधार विधानसभा मतदार संघातील नांदगाव व कांजाळातांडा, कदमाचीवाडी या गावात गेल्या निवडणुकीत एकाच उमेदवाराला ७५ टक्के पेक्षा जास्त मतदान झाल्याने व कदमवाडी या गावाचा रस्त्यासाठी बहिष्कार टाकला असल्याने या तिन्ही गावांना गंभीर गावे समजण्यात आले आहे.आदर्श आचारसंहितेची नियमावली सांगून सर्वांकडून आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीला राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे,नायब तहसीलदार अनिल परळीकर, मन्मथ थोटे,श्रीमती पी.डी.जोगदंडे यांची उपस्थिती होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *