अंतराळ वीरांगना: कल्पना चावला* 17 मार्च जयंती विशेष

 

अनेक मराठी माणसानी इतिहास घडविला पण प्रत्येकाचा इतिहास लिहिला गेला नाही. पण अशी एक व्यक्ती आहे की ज्यांचा इतिहास आवर्जून लिहावाच लागला. आज जवळजवळ सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून कार्य करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्या पासून ते राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या आहेत. तसेच अवकाशात भरारी घेणाऱ्या आज पर्यंत जगातील 75 महिला आहेत. त्यातील कल्पना चावला ही एक दैदिप्यमान भारतीय वंशाची पहिली अंतराळवीर महिला आहे. त्यामुळे जगातील संपूर्ण मुलींना, महिलांना कल्पना चावला या प्रेरणास्रोत आहेत.

त्यांना मिळालेली लोकप्रियता पाहून अमेरिकेतील *’नासा’* या संशोधन संस्थेने त्यांच्या एका सुपर कॅम्पुटरचे नाव कल्पना चावला असे ठेवले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व संघर्षाचा इतिहास आपण या लेखात अभ्यासणार आहोत. त्यासाठीच हा लेखन प्रपंच….

कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल तर आईचे नाव संज्योती असे होते. त्यांना मोंटू नावाने घरात बोलले जात होते, बंधू संजय आणि बहीण दीपा अशी भावंडे होती , त्यांचा आवडता खेळ बॅडमिंटन, आणि न्यूयॉर्क शहर आवडायचे. कल्पना चावलाने शिक्षक किंवा डॉक्टर व्हावे, अशी आई -वडिलाची इच्छा होती. परंतु तिने जिद्दीने अवकाश भरारीच घेण्याची मनोकामना व्यक्त केली

. म्हणून ती प्रत्येक भारतीयांच्या मनातील अंतराळ परी झाली. भारताच्या महान अंतराळवीर कन्या म्हणून त्या समोर आल्या त्यांनी चंडीगड येथून एरोनाॅटीकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे विमान प्रशिक्षक जीन पिंयर हॅरिसन यांच्याशी तिचा 2डिसेंबर, 1983 रोजी विवाह झाला .1984 मध्ये अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातून शिक्षण घेतले.
1988 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी तिने घेतली .
1995 मध्ये ‘नासा’या अंतराळवीराच्या मोहिमेत सहभागी होत्या .1997 मध्ये त्यांची पहिल्या अंतराळ उड्डाणासाठी निवड करण्यात आली.
पहिल्या अवकाश प्रवासादरम्यान 372 तास त्या अंतराळात होत्या.
16 जानेवारी 2003 रोजी त्यांचा दुसरा अंतराळ प्रवास कोलंबिया यानातून सुरू झाला,1फेब्रुवारी 2003 मध्ये कोलंबिया अंतराळ यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला आणि टेक्सास वर क्रॅश झाले.त्यामुळे सात ही अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला. भारताने आपल्या पहिल्या हवामान उपग्रहाला कल्पना चावलाच्या स्मरणार्थ कल्पना -1 असे नाव दिले. तसेच भारत सरकारने 1982 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सुवर्णपदक स्पेस मेडल प्रदान केले. त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आपण त्यांच्याकडून त्यांच्यात असलेली अवकाश भरारीची जिद्द, चिकाटी, शिकावी. बालपणी त्यांनी पाहिलेले स्वप्न वास्तववादी आणले हे लक्षात ठेवावे. प्रयत्नाला श्रमाची जोड झाली की आपोआप प्रकाशाच्या वाटा मिळत जातात. त्यासाठी श्रम हा विकासाचा पाया असतो. म्हणूनच जिद्दी माणसे सिद्धी मिळवतात हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. कल्पनेतून कल्पनेने साकारलेली मूर्ती म्हणजेच कल्पना चावला होय. निष्कलंक चारित्र्य, निस्वार्थी वृत्ती,साधी राहणी, कमालीची सहनशीलता, पारदर्शी विचार व त्यातून आलेली निर्भयता, जनहिताचे निर्णय घेण्याची क्षमता, अभ्यासूवृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती,
निरपेक्ष बुद्धीने विधायक काम करण्याचे आस आणि परिवर्तनशील उपक्रम यशस्वीपणे त्यांनी राबविले.
हे सत्य काल, आजही आणि उद्याही सत्य राहील, असे मला वाटते. मरावे परी कीर्ती रुपी उरावे हे सुभाषित त्यांना जशाच्या तसे लागू होते. तमाम भारतीयांना प्रेरणास्रोत म्हणून पहिले अंतराळ वीर पुरुष राकेश शर्मा आणि पहिल्या अंतराळवीर महिला कल्पना चावला यांनी उत्तुंग झेप घेतली आणि भल्याभल्यांची झोप उडवली त्यांचे कार्य भारतीयांना वर्षानुवर्ष स्मरणात राहील, त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. ..

शब्दांकन
*प्रा. विठ्ठल लक्ष्मीबाई गणपत बरसमवाड* अध्यक्ष : विठूमाऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *