नांदेड. दि.२३.
सिडको हडको हा काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला आहे आणि या पुढेही राहील अशी ग्वाही सिडको भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली.
नांदेड लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंतराव बळवंतराव पा.चव्हाण यांची नुकतीच उमेदवारी घोषित करण्यात आली. त्या अनुषंगाने
सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेश पाटील शिंदे मांजरमकर यांनी दि.२२.०३.२४ रोजी
सायंकाळी ठीक सात वाजता हडको भागात एक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते.
सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी
माजी नगरसेविका डॉ. करुणा जमदाडे ह्या होत्या तर व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण, माजी नगरसेवक हबीब बावजीर, सिडको ब्लॉक अध्यक्ष महेश पाटील शिंदे, नांदेड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष शेख लतीफ, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा महासचिव विभागाचे किशनराव रावणगावकर, सिडको अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष मोहम्मद नुरोद्दिन,
ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते देविदास कदम, शंकरराव धिरडीकर, प्रल्हाद गव्हाणे, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडको ब्लॉक अध्यक्ष महेश शिंदे यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बालाजी चव्हाण म्हणाले की काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मातील व तळागळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सामान्य लोकांना न्याय देणारी आहे म्हणून आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे व खंबीररित्या उभे राहावे. व या भागातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात केली.
यावेळी माजी नगरसेवक हबीब भाई, प्रल्हाद गव्हाणे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ करूनाताई जमदाडे म्हणाल्या की फुले-शाहू- आंबेडकर – अण्णाभाऊ च्या विचाराची कास घेऊन काँग्रेस पक्ष हा सामाजिक न्यायाच्या दिशेने वाटचाल करणारा पक्ष आहे. रात्रही वैऱ्याची आहे त्यासाठी
काँग्रेस पक्षाला अधिक मजबुती व बळकटी देण्याचे काम आपण सर्वांनी तळमळीने केले पाहिजे.
हुकूमशाहीला गाडून परत एकदा देशात व महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष म्हणू व अनु असा निर्धार यावेळी त्यांनी अध्यक्षीय समारोपात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शशिकांत हटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नारायण शिंदे यांनी मानले.
या वेळी सर्व सिडको हडको व परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे
नांदेड लोकसभेचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
या बैठकीला संजय कदम,शेख मोईन लाटकर, संजय श्रीरामे, पत्रकार संतोष कराळे, विजेंद्रसिंह ठाकूर, एस.पी.कुंभारे,
तुकाराम झडते, शेख युसुफ, सौ. कविता चव्हाण, सौ. सुमन पवार,साईप्रसाद उलीगडे, गोल्डी जमदाडे, डी.वाय.मिसाळ, राजेश गडंबे, विजय पाटील वडजे, के. बी.टर्के, कैलाश पवळे, राजरत्न चित्ते, श्रीराम सर, शुभम, पांचाळ, गणेश शिंदे, यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.