मानवताला बरबाद करणार माध्यम म्हणजे मोबाईल..
एक कुटुंब आणि त्या कुटुंबातील मुख्य घटक ज्यांची प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद कोणाची असते? तर याचे उत्तर सहजपणे कोणीही सांगू शकतो. ते म्हणजे आपले वडील, 90 च्या दशकानंतर हळूहळू विभक्त कुटुंबपद्धती ही सगळ्यांच्याच अंगवळणी पडली आणि मग मुलगा लग्नानंतर आई-वडिलांपासून विभक्त राहू लागला. त्यामागची कारणं वेगवेगळी असतीलही कदाचित, पण या सगळ्यात होरपळून निघाले ते वयोमानाने थकणारे आई-वडील. यातूनच ज्येष्ठ नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला सुरुवात झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे नुकतंच या समस्येवर भाष्य करणारा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. खरंतर या विषयावर याआधीसुद्धा मराठी विश्वात बरेच चित्रपट येऊन गेले आहेत.
चित्रपट सुरू होताच गोविंद पाठक यांची इन्ट्री पाहायला मिळाली. ते भाजी मार्केट मध्ये गेले आणि भाजीपाला घेऊन ते उधारी पैसे ठेवले होते. तेव्हा भाजी मंडई मालकीन मंदा गावडे यांनी त्यांना पैसे द्या म्हटली पण गोविंद पाठक यांच्याकडे पैसे नव्हते पण आल्यावर तुला देईल तुझे पैसे बुडवत नाही मी कलेक्टरचा बाप आहे असं अभिमानाने सांगत सांगत पुढे गेले. मार्केटमध्ये एका गुंडांनी म्हणजेच (ओंकार भोजने) यांनी एका व्यापाऱ्याकडून पैसे जबरदस्तीने घेत होते. पण त्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे अगोदरच कमी पडत होते म्हणून तो देण्यासाठी तयार नव्हता पण त्यांनी जबरदस्तीने पैसे घेऊन पुढे निघाले, तेवढ्यात गोविंद पाठक हे समाजसेवक त्यांच्याच्या पुढे उभे राहून त्या गुंड्याला पैसे परत दे बोलले परंतु तो नकार दिल्याने त्याला एक कानाखाली गोविंद पाठक यांनी फटका दिला. त्यांनी सुध्दा गोविंद पाठक यांना प्रत्युत्तर देऊन पक्याभाईकडे घेऊन गेला. तेंव्हा डॉन पक्याभाई बंदूक दाखवून माझ्या मुलाला मारतो का म्हणून गोविंद पाठक यांना मारण्याचा प्रयत्न केला असता गोविंद पाठक यांच्या शब्दाने डॉन त्यांच्यावर फिदा झाले आणि पुढे त्यांची मैत्री झाली.
सत्तरीमधील एक वयोवृद्ध जोडपं गोविंद पाठक (महेश मांजरेकर) आणि त्यांची पत्नी सुहास पाठक ( मेधा मांजरेकर ) जे बोरिवलीच्या एका छोट्याशा घरात रहात असतं. त्यांचा मुलगा IAS अधिकारी अभय पाठक ( भूषण प्रधान ) हा त्याची पत्नी अवनी (अनुषा दांडेकर) सह वेगळा राहत असतो पण त्याचे सासरे म्हणजेच अवनीचे वडील (समीर धर्माधिकारी) यांचा त्याच्यावर वरदहस्त असतो. आपल्या आई-वडिलांना अभय दरमहा काही पैसे देत असतो आणि आपल्या वडिलांचं बँक अकाऊंटही तोच हाताळत असतो. त्यांच्याच भविष्यासाठी अभय त्यांच्या पैशांची योग्य ती गुंतवणूक करत असतो. पण कामाच्या व्यापात अडकलेल्या अभयकडे आई-वडिलांसाठी कदापि वेळ नसतो. या गोष्टीवरुनच पुढे त्यांच्यामध्ये कुरबुरी वाढत जाते.
एकेदिवशी सुहासची तब्येत बिघडल्याने गोविंद तिला रुग्णालयात घेऊन जातात पण इलाजासाठी भरावे लागणारी डीपॉझीटची रक्कम मात्र त्यांच्याकडे नसते. यामुळे तिथेच रुग्णालयातच गोविंद यांची पत्नी सुहास शेवटचा श्वास घेते. मुलगा वडिलांचं बँक अकाऊंटही तोच हाताळत असतो म्हणून आईच्या मृत्यूचा कारणीभूत अभय पाठक ठरतो अस गोविंद पाठक म्हणतात पुढे, जेव्हा मुलगा अभय दुसऱ्या दिवशी पैसे द्यायला घरी येतो आणि त्याला झालेल्या प्रकाराबाबत समजतं तेव्हा तो हैराण होतो आणि इथूनच बाप आणि मुलामधला एक वेगळाच संघर्ष सुरू होतो. त्याच वेळी माझी पत्नी तुझ्यामुळे गेली असा दावा करून गोविंद पाठक हे आपल्या मुलाला कोर्टात खेचतात आणि एक भली मोठी रक्कम म्हणजे, 4 कोटी 72 लाख 86 हजार 100 रुपये नुकसान भरपाई म्हणून मागतात.
पुन्हा कोर्टात हा खटला चालू असतो. चार ते पाच वेळा कोर्टात सुनावणी होते. यात गोविंद पाठक मात्र टिव्हीवर बातम्यांच्या माध्यमातून प्रसिद्ध होतात. एकदा ते बँक मध्ये 40 हजार रुपये काढायला जातात. तेव्हा बँक मधील कर्मचारी त्यांना पाहून भावुक होतात आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह करतात पुढे लगेच बँक मॅनेजर गोविंद पाठक यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून चेकने 40 हजार रुपये देतात. पुन्हा बँक मॅनेजर म्हणतात तुमचा इन्स्टा आयडी काय आहे? तेव्हा गोविंद पाठक शब्दांनी भडकतात आणि सांगतात या जगात सर्वात घातक शोध कोणता लागला असेल तर मानवता बरबाद करणार माध्यम म्हणजे मोबाईल या मोबाईल मुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले. यामुळे खरी मानवता धोक्यात अस पण ते सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोशल मीडियावर होते का? असा सवाल बँक मॅनेजर ला केला. पुन्हा सांगितले आई-वडिलांना खऱ्या आयुष्यात फॉलो करा. असेही ते म्हणाले.
वेगवेगळ्या गोष्टी मांजरेकर यांनी कव्हर केल्या आहेत. विभक्त कुटुंबपद्धती, मानवी नातेसंबंध, इंटरनेट आणि मोबाइलमुळे कुटुंबातील संपलेला संवाद, आई-वडील आणि मुलांच्या नात्यात आलेला दुरावा, पैशांच्या मागे धावणारा महत्वाकांक्षी तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, सरकारी यंत्रणांनी त्यांच्याकडे केलेला कानाडोळा अशा वेगवेगळ्या विषयांवर मांजरेकरांनी कथा आणि पटकथेच्या माध्यमातून उत्तमरित्या भाष्य केलं आहे. पुन्हा कोर्टात गेल्यावर गोविंद पाठक हे तो खटला 4 कोटी 72 लाख 86 हजार 100 रुपये जिंकतात. पुन्हा घरी जाऊन IAS अधिकारी अभय पाठक यांना कॉल करून सांगतात की, तुझी आई जिवंत आहे मुलगा आनंददायी होतो परंतु त्याची पत्नी अवनी हे ऐकल्यावर रागावते आणि पुढे, आपल्या सासऱ्याच्या विरोधात 10 कोटी चा अब्रू नुकसान मानहानीचा दावा कोर्टात सादर करते. तेव्हा चित्रपटाला वेगळेच वळण आले. गोविंद पाठक यांना अटक करण्यात आले. पुन्हा कोर्टात सुनावणी सुरू झाली. गोविंद पाठक यांच्याविरुद्ध गोविंद पाठक यांच्या वकिलांनी गोविंद पाठक यांनी त्यांच्या कुटुंबासोबत केलेल्या कष्टांची व्यथा मांडली तेव्हा सगळेच भावुक झाले. परंतु गोविंद पाठक यांच्या पत्नी सुहास पाठक ह्या खऱ्याच मृत्यू झाल्या होत्या. हे तिथल्या साक्षीदारांनी सांगितलं त्यावेळी दवाखान्यात प्रकाश दगडू ढोपे हे जर तिथे नसले असते तर आज सुहास पाठक त्या इथे दिसल्या नसत्या ते कसे तर प्रकाश दगडू भोपे यांनी डॉक्टर ला बंदूक दाखवून सुहास पाठक मृत्यू झाल्यावर सुध्दा त्यांना शॉक दे डॉक्टरला सांगितलं तेव्हा तो बंदुकीच्या भीतीने शॉक दिला तर खरंच सुहास पाठक ह्या जिवंत झाल्या. यात रामदास सावंत यांची गोविंद पाठक यांना खूप मोलाची शेवटपर्यंत मदत लाभली.
हे सगळं करण्यामागे एकच कारण होतं. गोविंद पाठक म्हणतात, मी गुन्हा केला परंतु लाखो ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या त्यांचे दुःख त्यांच्या वेदना मी जगासमोर आणू शकलो याचा मला आनंद आहे. 4 कोटी 72 लाख 86 हजार 100 रुपये या पैशाचे तळेगावला “ओल्ड इज गोल्ड” या नावाचे वृद्धाश्रम बांधले. हे सगळं ऐकून अवनी ही आपल्या सासऱ्या विरुद्धचा खटला मागे घेते. आणि ती कोर्टातून निघून जाते. परंतु परजरीचा गुन्हा हा सिद्ध झाला यामध्ये, गोविंद पाठक, प्रकाश ढोपे, रामदास सावंत, डॉक्टर शैलेश देशपांडे हे देखील सहभागी आहेत यात सर्वांना सहा महिन्याची सक्त मजुरीची सजा सुनावण्यात आली.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ‘जुनं फर्निचर’… या नावातच चित्रपट काय आहे, याचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय आणि याबाबतचा किस्सा मी स्वतः पाहिला आहे. त्यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे. हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या मुलांसोबत नक्की पाहावा, त्यातून कदाचित मुलांचा दृष्टीकोन बदलेल.’’
समीक्षा:
युवा साहित्यिक: सोनू दरेगावकर, नांदेड
संपर्क :7507161537