*लोहा-कंधार तालुक्यातील १००० वयोवृद्धांच्या डोळ्याचे आॕपरेशन पुर्ण होणे आणि पुरुषोत्तम व मनिषा धोंडगेचा लग्नाचा वाढदिवस डोळ्यांचे आॕपरेशन झालेल्या मायबापांच्या सहवासात साजरा होणे हा दुग्धशर्करा योग!*
कंधार/प्रतिनिधी
माजी जि. प. सदस्य प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानात आता पर्यंत १००० वृध्दांवर यशस्वी मोतीबिंदू व डोळ्याच्या पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्यांना नवीन दृष्टी मिळाली असून या समाजोपयोगी उपक्रमातून प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. डाॕ.पुरुषोत्तम आणि मनिषा धोंडगे यांच्या लग्नाचा वाढदिवस आणि डोळ्यांचे १००० आॕपरेशन पुर्ण हा दुग्धशर्करा योग होय.
प्रा.डाॕ.पुरुषोत्तम धोंडगे सामाजिक कार्य युवा मंच लोहा-कंधारच्यावतीने दोन्हीही तालुक्यातील गाव वाडी तांड्यात मोफत नेत्ररोग तपासणी होवून मोतीबिंदू व पडद्याची शस्त्रक्रिया उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर येथे केली जात आहे.
डॉ. भाई केशवराव धोंडगे यांनी आयुष्यभर तळागाळातील बहुजन आठरा पगड जाती धर्मातील लोकांसाठी काम केले. गोर – गरिब, दीन – दलितांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटले. डॉ.भाई धोंडगे यांच्या सामाजिक कार्याचा वसा व वारसा प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे पुढे चालवत असल्याची चर्चा कंधार- लोहा तालुक्यातील जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
भाऊचा डबा, रोजगार निर्मितीसाठी तरुणांना हातगाड्याचे वाटप, अपंग व होतकरु विद्यार्थ्यांना यथाशक्ति मदत, नैसर्गिक आपत्तीकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी अशा अनेक सामाजिक कार्याने दोन्हीही तालुक्यास परिचित असणाऱ्या प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या वडिलांच्या काळात त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या वृद्धांची वयोमानानुसार दृष्टी कमी झाली त्यांना नवी दृष्टी देऊन अंधमुक्त करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात मनापासून उतरवताना कंधार लोहा तालुक्यातील प्रत्येक गरजवंताला, तळागाळातील सर्व गोर गरीब जनता जनार्दन मायबापांना या उपक्रमाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात असल्यामुळे सर्वच स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
अभियानाची जिल्हाभर चर्चा
सामाजिक बांधिलकीतून अनेकजण विविध उपक्रम राबवितात. गोरगरिबांना मदत व्हावी, हा उद्दात हेतू या पाठीमागे असतो. प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कंधार लोहा तालुक्यातील दृष्टिहीन वृद्धांना दृष्टी देण्याचा संकल्प केला आणि मोफत शस्त्रक्रिया अभियान हाती घेतले. या अभियानात आतापर्यंत १००० गरजुवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आजपर्यंत अनेकांनी चष्मा वाटपा पर्यंतचे अभियान राबवले पण डोळ्यांचे शस्त्रक्रिया अभियान लोहा-कंधार तालुक्यात पहिल्यांदाच राबविले जात असल्याने या अभियानाची जिल्ह्याभर चर्चा होत आहे.