लोकशाहीच्या मतदानोत्सवात सहभागी होतांना राष्ट्राभिमानाचे मनी स्फूरण चढते! सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर

कंधार : सध्या देशात ७ टप्प्यात लोकसभेची मतदान प्रक्रिया सुरु आहे.मी कंधार शहरातील छ. शिवाजीनगराच्या गोकुळ निवास्थानी वास्तव्यास आहे.लोकसभा निवडणुकीत मतदारांची जागृती माझ्या लेखनीतून करतांना मनस्वी आनंद वाटतो आहे.

लोकसभा निवडणुक ७ टप्प्यात पार पडणार आहे.त्यातला पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ दुसरा टप्पा २६ एप्रिल २०२४ रोजी पार पडला, तर तिसरा म्हणजे आजचा ७ मे २०२४ रोजी लातूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस. सकाळी-सकाळी योग साधना केल्यानंतर सुगंधीत उटणे लावून अभ्यंग स्नान केल्यानंतर भारत मातेच्या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होऊन माझ्या गावातील जि.प.कें.प्राथमिक कन्या शाळा क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार या ज्ञानालयातील वार्ड क्रमांक ३ च्या मतदान केंद्रावर सौ.संगीता दत्तात्रय एमेकर पुर्णांगी सोबत घेऊन पवित्र मतदान ईव्हीएम यंत्रणावर टाकण्यासाठी गेलो.

 

मला मतदान करण्यास शारिरीक अडचण असल्याने माझ्या सौ.पुर्णांगीने भारतीय संविधान ग्रंथराजाने दिलेले मतदानाचा हक्क बजावतांना राष्ट्राभिमान जाणवतो.आमच्या बुथवर प्रत्येक मतदानाच्या दिनी सकाळीच आमच्या क्रांतिभुवनबहाद्दरपुरा नगरीचे भुषण ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार,विद्रोही विचारवंत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या अत्तरगंधा शिवाय मतदान करावे लागले.मतदान करण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा होती.मतदान केंद्रावर सर्वकांही व्यवस्थित सुरु आहे.

( मतदान जनजागृती मध्ये दत्तात्रय एमेकर सर यांनी सहभाग घेत काव्य लेखनातून मतदान करण्याचे नुकतेच त्यांनी आवाहन केले होते .)

आमच्या बहाद्दरपूरा नगरीचे युवा पोलिस पाटील मा.शरदराव पोकले यांनी व त्याचे सहकारी व्यंकटेश पेठकर सर,रविकुमार कदम,परोडवाड, बाळू सोळंके, गुरुनाथ एमेकर,कदम,कैलास उदगीरवाड रामचंद्र सोळ॔के,आदींनी सहकार्य केल्याने मला प्रत्यक्ष मतदानाचा हक्क ईव्हीएम बजावता आला.

गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी व सौ.संगीता दत्तात्रय एमेकर रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार आणि सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *