आयुष्यात सेक्स इतका महत्वाचा आहे का ?? पुरूष हृदय.. भाग 51

गेली अनेक वर्षे लैगिकतेवर सातत्याने काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे लैंगिकतेचा अभ्यास करण्यापेक्षा किवा त्यातील सौंदर्य जाणून घेण्यापेक्षा लिंगपिसाट प्रवृत्ती खुप जास्त बळावली आहे.. सकाळ , संध्याकाळ डोक्यात फक्त एकच विचार यात पुरूष अग्रेसर आहेत.. sex is not a life.. its a part of life आणि म्हणुन अध्यात्म सांगतं की मुलाला जन्म देण्यासाठी सेक्स करा त्याचं कारण म्हणजे आपण मुळ उद्देशापासुन दुर जातो आणि सेक्स ला महत्व देतो.. सतत तुम्ही सेक्स सेक्स करत राहिला तर व्यायाम , वाचन किवा आपलं रुटीन वर्क यात मागे रहाल .. फक्त पैसा कमावला म्हणजे प्रगती नाही ना..

माझी एक वाचक सखी आहे ती रेग्युलर तिच्या नवऱ्याबद्दल मला मेसेजेस करत असते.. वाचून खरच वाईट वाटतं.. आपण पशु आहोत की माणसे असा प्रश्न पडतो.. नर असणं काय ते अशा व्यक्तीकडे पाहिलं की जाणवतं आणि अशा प्रवृत्तीची किळसही येते.. स्त्रीया हे का सहन करतात असा प्रश्न पडतो..

स्त्रीची मासिक पाळी सुरु असताना फोर्सफुली तिला तयार करणं नाही म्हटलं की शिव्या देणं.. ड्रींक करुन येवुन जबरदस्ती करणं असेल.. अंगाला घामाचा वास येत असताना त्याची इच्छा असते की तिने हो म्हणावं अशा अनेक गोष्टी करताना ती आपली बायको आहे आणि माणूस आहे हे तो सोयीस्करपणे कसा काय विसरु शकतो..

सकाळी ७ वाजता एका मुलाचा मेसेज वाचला आणि सटकली. मी त्याचं काउंसीलींग केलं होतं त्यामुळे त्याने मेसेज केले म्हणुन सटकली नाही तर त्याला मी व्यायाम करायला सांगितला होता. डाएट दिला होता.. या सगळ्यावर न बोलता मॅम मला इरेक्षन होत नाही हा मेसेज सकाळी ७ वाजता वाचायला नको होतं.. काउंसीलींगमधे मी लोकांना इतक्या गोष्टी सांगत असते पण फिरून फिरुन यांची गाडी भोपळे चौकात.. कधी कधी वाटतं , स्त्रीया वैतागतात ते उगाच नाही..

डीपी वर कमेंट करताना सुध्दा Nice clevage असा मेसेज येतो त्यावेळी म्हणावं वाटतं की क्लीव्हेज सोडून त्या फोटोत अनेक गोष्टी आहे त्या बघ की. सौंदर्य पहाण्यासारखी सुध्दा वैचारिक लेव्हल वरची असायला हवी .. एका मित्राला म्हटलं , सुट्टी आहे तर काही वाचतोयस की नाही ??.. त्यावर तो म्हणाला , दिवसभर तुझे डीपी पहात असतो.. काय व्यक्त व्हावं यावर ..
मी पुरुषांवर प्रेम करते पण अशा वृत्तीच्या लोकांची खरच किळस येते.. मॅम कोणी मैत्रीण असेल तर सांगा ना…मैत्रीणी काय रस्त्यावर पडल्या आहेत का ??.. माझं काम मार्गदर्शन देणं हे आहे.. फालतू गोष्टी करत बसून माझा मौल्यवान वेळ मला वाया घालवायचा नाही.. ज्या पुरुषाला स्त्रीचा आदर करता येत नाही तो पुरूष नाही.. शिवाजी महाराजांची ही शिकवण आपण सोयीस्करपणे विसरतो आणि झेंडे घेउन धावत जातो.. सोशल मिडीयावर महिलांवर वाईट कमेंट करुन आपले पुरूषत्व सिध्द करण्यात कसला आलाय शहाणपणा .. एक स्त्री लैंगिकतेवर तुम्हाला मार्गदर्शन करतेय .. इतक्या पवित्र सुंदर भावनेकडे आपण घाणेरड्या नजरेने पहाणार असु तर तुमच्या मुली सुनेकडे इतरांनी त्याच नजरेने पाहिले तर वावगं ठरु नये..
सोच बदलो.. देश बदलेगा.. कटु आहे पण सत्य आहे
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *