नांदेड: बारावी बोर्ड परीक्षेच्या नुकताच जाहीर झालेल्या निकालामध्ये विश्वनाथअप्पा हुरणे ज्यूनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विज्ञान व वाणिज्य शाखेच्या१००% निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमान यश संपादित केले आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉलेजच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा १००% निकाल लागला आहे.
वाणिज्य शाखेमधून अकाऊंट या विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 37 विदयार्थी हे हुरणे कॉलेजचे आहेत हा एक नवीन विक्रम आहे. हर्ष रमेश अमिलकंठवार 97.5% घेऊन नांदेड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. संगमकर ऋषिकेश व शिराढोणकर पुष्कर यांनी संयुक्तरित्या 97 % गुण घेऊन महाविद्यालायातुन दुसरा क्रमांक पटकावला तर राठी परिधी सतीश 96.5% गुण घेऊन तिसरा येण्याचा क्रमांक पटकावला. तसेच वाणिज्य शाखेत ९०% पेक्षा जास्त गुण घेणारे 54 विद्यार्थी, ८०% पेक्षा जास्त गुण घेणारे 40 विद्यार्थी, ७५% पेक्षा जास्त गुण घेणारे 9 विद्यार्थी आणि 103 विद्यार्थी विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत. विज्ञान शाखेमधून कु. स्वरा विक्रम चालिकवार 94.5% घेऊन नांदेड जिल्ह्यातून प्रथम आली तसेच नरवाडकर आर्णव 93% घेऊन दुसरा क्रमांक व कु. देशपांडे स्वरा 92.33% घेऊन तृतीय क्रमांक आणि कु. सिद्धी बियाणी 91.33% गुण चौथा क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे. बारावीच्या निकालामध्ये विज्ञान शाखेत ८०% पेक्षा जास्त गुण घेणारे 62 विद्यार्थी तर ७०% पेक्षा जास्त गुण घेणारे 82 विद्यार्थी आहेत. महाविद्यालयातून संस्कृत या विषयांमध्ये 8 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले, अर्थशास्त्र या विषयांमध्ये 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेतले आहेत गणित या विषयांमध्ये 2 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेतले आहे व तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेद्र हुरणे, उपाध्यक्ष श्री. संतोष पटणे, सचिव श्री. अविनाश मारकोळे पाटील कामजळगेकर, कोषाध्यक्ष श्री. राजन मिसाळे, सतीश मारकोळे पाटील, दादाराव आगलावे, प्राचार्य. डॉ. श्रीराम अय्यर, प्रा. एनगुंदे एन. एम, श्री. मिरकुटे एम.आर., यांनी गुणवंत विद्यार्थांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार केला व श्री. लिखारी डी.के. व बालाजी सूर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.