नांदेड – ग्रंथ प्रेमी, सुप्रसिद्ध चित्र चारोळीकार, निवेदक, गायक, समीक्षक, मिमिक्रीकार, मानवी कल्याणाचा बादशहा, गोरगरीब जनतेची हेल्पलाईन, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त, दि. 12 जून 2024 रोजी वडेपुरी येथील माता अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात ‘एक मित्र, एक वृक्ष’ या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत नांदेडात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीने वृक्ष दान आणि वृक्ष रोपण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी आयोजक सोनू दरेगावकर मित्रपरिवार यांच्यावतीने कार्यक्रमाला येणाऱ्या व्यक्तींना हार-तुरे, केक, शॉल घेवून न येता फक्त शुभेच्छा म्हणून एक वृक्ष सोबत घेऊन यावे असे आवाहन केले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. आणि शेकडो झाडे लावून निसर्गरम्य वातावरणात आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी, श्री. माता अन्नपूर्णा मंदिरच्या अध्यक्ष सुषमा गहेरवार, माँ संतोषी हॉस्टेलच्या संचालिका जयश्री जयस्वाल, हास्य कलावंत गजानन गिरी, साहित्यिक डॉ. हनुमंत भोपाळे, रणजी क्रिकेटपटू सुनील जाधव, मुख्याध्यापक पंडित पवळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक पावडे, डॉ. श्रीनिवास पल्लेवाड, विजयसिंह गहेरवार, संजयकुमार जयस्वाल, विष्णुकांत वैजवाडे, अपर्णा सावळे, पूजा बिसेन, सेवा ग्रूपच्या अध्यक्ष अनुराधा वैजवाडे, रिल्सस्टार वर्षा जाधव, अरुणा पुरी, रमेश तालीमकर, अविनाश पाईकराव, मदनकुमार बैस, दत्तप्रसाद तालीमकर, सिद्धांत वाघमारे, वंदना आरमाळकर, लक्ष्मीबाई कोत्तावार, सुशिला आल्लमवाड, शैलजा मामडे, बाळासाहेब मुळेकर, बालाजी आचमे, हनुमंत माळेगावकर, कृष्णा भालेराव, शुभम गिरी, सचिन दरेगावकर, शुभम शेळके, शुभम दरेगावकर, गजानन वाघमारे, मनोज लांडगे, ईश्वर राठोड आदींची उपस्थित होती.