संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल- गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे प्रतिपादन….! बासर येथे ऐतिहासिक सामूहिक सरस्वती पूजन विद्यारंभ सोहळा उत्साहात संपन्न.

 

नांदेड: (दादाराव आगलावे)

80 टक्के समाजसेवा 20 टक्के आध्यात्मिक सेवा घडवण्याचं करावं म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जनतेपर्यंत पोहोचता येईल आणि हेच कार्य स्वामींना अभिप्रेत आहेत अभिप्रेत आहे. अंतकरणावर संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तरच देश टिकेल हे वास्तव आहे असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले.

श्री क्षेत्र बासर येथे सरस्वती माता सामूहिक पूजन व विद्यारंभ सोहळा दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते सेवेकर यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

गुरुमाऊली पुढे म्हणाले की, सरस्वती मातेकडे आपण मागणे मागू की, आम्हा भारतीयांना सर्व भाषा बोलता आल्या पाहिजेत एवढी कृपा आमच्यावरती करा जेणेकरून हा देश एकसंघ राहील. आपण राष्ट्राचे काही देणं लागतो या दृष्टिकोनातून राष्ट्रीय एकात्मता आपल्यात निर्माण व्हावी देशभरातील गुरुजनांनी राज्य-राज्यामध्ये गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या जिभेवरती अँम हा मंत्र लिहून त्यांच्या अंतकरणावर संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकलातरच देश टिकेल हे वास्तव आहे, म्हणून आपणाला सुसंस्कार वयाच्या पाच वर्षापेक्षा आईच्या पोटात असतानाच माता भगिनींनी नव्या पिढ्यावर संस्कार करावे. गर्भसंस्कार, शिशु संस्कार व मूल्य संस्कार हा एक विद्याभ्यास आहे. देशभरात पुढील पिढ्यांसाठी श्रावण बाळासारखे-पुंडलिका सारखे त्यांना सांभाळण्याजोगे आज्ञाधारकपणा आचरणात आणण्यासाठी वर्धाश्रम भारत मुक्त करण्यासाठी हे कार्य या ठिकाणी सुरू झाले आहे.

 

त्यासाठी आपण घराघरात पुंडलिक व श्रावण बाळ कसे तयार होतील व या विषयी आवड कशी निर्माण होईल याकडे लक्ष पुरविले पाहिजे. मानव जातीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात शैक्षणिक समस्या, कौटुंबिक समस्या, नोकरीची समस्या, शेतीची समस्या, आजारपणाची समस्या दूर करण्यासाठी तणावमुक्त जीवन प्राप्त करण्यासाठी प्रश्न उत्तर प्रतिनिधीशी संपर्क साधला पाहिजे, जेणेकरून स्वामीकार्य गतिमान होईल. ज्यांचे विवाह बिन हुंड्याचे, सोन्या नाण्याविरहित झालेत. 70 वर्षातील अनुभव त्यांचा एकही आजपर्यंत घटस्फोट झाला नाही, त्यांचे संसार सुखी समाधानाने चालत आहे म्हणून यापुढे साखरपुड्यातच विवाह झाले पाहिजेत जेणेकरून खर्चही वाचेल व प्रेमही वाढेल यासाठी आमच्या विवाह प्रतिनिधीशी आपण संपर्क साधण्याचे आव्हाने गुरुमाऊलींनी केले.
या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी विद्येची व बुद्धीची देवता असलेल्या सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. श्री क्षेत्र बासर हे पाल्यांच्या अक्षर अभ्यासासाठी म्हणजेच शैक्षणिक आरंभासाठी सुप्रसिद्ध आहे म्हणूनच मूल्यसंस्कार विभागाच्यावतीने पालक व पाल्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये भक्ती व मूल्यसंस्काराची शिकवण रुजवण्याचा विधायक हेतू या उपक्रमातून साध्य करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून आलेल्या हजारो मुले, युवा-युवती आणि पालकांनी सामुहिक पद्धतीने सरस्वती मातेचे पूजन केले.

 

गुरुपुत्र नितीन मोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातुन सोहळ्यास उपस्थित सेवेकरी पालक-पाल्यांशी प्रबोधनात्मक संवाद साधला. दोन दिवसीय आयोजित या सोहळ्यास राज्यातून-परराज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ज्यामध्ये श्री क्षेत्र बासर श्री सरस्वती देवस्थान संस्थानचे चेअरमन शरद पाठक, श्री श्री श्री बालयोगी रामलू महाराज नंदीपेठ तेलंगणा राज्य, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, रवींद्र उर्फ बंडू पाटील, युवा उद्योजक सुबोध काकाणी, सौ. सपना हरणे न्यायधीश न्यायालय धर्माबाद, रामराव पवार पाटील आमदार मुधोळ-भैसा, श्री विश्वनाथ पाटील बिदराळीकर सभापती पंचायत समिती बासर, डी .लक्ष्मणराव सरपंच बासर यांच्यासह राज्यातील बहुसंख्य सेवेकरी भक्तगण उपस्थित होता. यावेळी परिसरातील सेविकाऱ्यांनी येणाऱ्या सेवेकऱ्यांचा यथोचित सन्मान करत संपूर्ण व्यवस्था केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *