सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न्याय हक्कासाठी संघटित व्हावे- बालाजी डफडे    

      कंधार ; प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना तालुका शाखा कंधार नूतन कार्यकारिनी ची निवड दि.१९ रोजी करण्यात आली .बैठकी च्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सल्लागार  विठ्ठलराव ताकबिडे होते . यावेळी राज्य संघटक बालाजीराव डफडे यांनी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी यांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटित व्हावे असे आवाहन केले .

या बैठकीला  जिल्हा सचिव रमेशराव गोवंदे, जिल्हा सल्लागार मदनराव नायके ,सेवा निवृत्त केंद्रप्रमुख तथा बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे माजी सदस्य  हरि गंगाधरराव नारलावर , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रल्हादराव तेलंग, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी  उद्धवराव चिद्रावार ,सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी तथा शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते शंकरराव जाधव आदी ची उपस्थिती होती.

       सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे तसेच सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी  शिवाजीराव दादाराव आगलावे, सेवानिवृत्त शिक्षक  दत्तात्रय जायभाये, सेवानिवृत्त शिक्षिका यशोधरा भारशंकर मॅडम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक  बी एन गुडमेवार इ.चा संघटनेच्या वतीने सेवानिवृत्ती बद्दल तसेच मुंडे क्लासेस मोंढा कंधार चे योगेश मुंडे यांचा त्यांनी केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्याबद्दल त्यांचा सदरील संघटनेच्या बैठकीत यथोचित सत्कार करण्यात आला.

         राज्य संघटक बालाजीराव डफडे यांनी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटने च्या माध्यमातून हजारो सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी इ.च्या सेवानिवृत्ती विषयक सेवानिवृत्ती उपदान ,ग्रॅच्युएटी भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायेगी , गट विमा योजना इ. रक्कमा शासनाकडे संघर्ष करून व पाठपुरावा  करून मिळवून दिल्याचे सांगितले. सेवानिवृत्तांनी या संघटनेचे आजीव सभासद होऊन संघटना बळकट करावी व आपल्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी संघटनेस हाक द्यावी .संघटना सेवानिवृत्तांच्या सेवानिवृत्ती विषयक अडी-अडचणी सोडविण्यासाठी सेवानिवृत्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

     सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शंकरराव जाधव यांनी या संघटने च्या माध्यमातून सेवानिवृत्तांच्या आरोग्यासाठी रोग निदान  शिबिरे, नेत्र शिबिरे इ.चे आयोजन करावे आम्ही सर्व सेवानिवृत्त संघटनेच्या पाठीशी आहोत संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले व संघटनेस खूप खूप शुभेच्छा दिल्या.
   बैठकीत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजीराव पवळे ,मुख्याध्यापिका सुमित्रा ताई कनकुटे , सेवानिवृत्त शिक्षक रामदास कागणे, सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय जायभाये, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव आगलावे इत्यादींनी त्यांच्या अडीअडचणी मांडल्या.
        प्रास्तविक  गणपतराव गुट्टे यांनी केले. या सभेत महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना तालुका शाखा कंधार ची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे सर्वानुमते निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी धोंडीराम गुंटुरे, तालुका सरचिटणीस पदी  गणपतराव गुट्टे, कार्याध्यक्षपदी  शंकरराव पुंडलिकराव जाधव कोषाध्यक्षपदी  शिवाजीराव दादाराव आगलावे तालुका उपाध्यक्षपदी  चंद्रकांत गणेशराव जोहरे , राम भुजंगराव गायकवाड,सुमित्राताई हरिभाऊ कनकुटे मॅडम, सहसचिव पदी  दत्ता नारायणराव जायभाये महिला प्रतिनिधी पदी यशोधरा भारशंकर , प्रसिद्धी प्रमुख  भालचंद्र गुडमेवार सल्लागारपदी प्रल्हादराव तेलंग, हरी नारलावार, उद्धवराव चिद्रावार इ.ची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन कार्यकारणी च्या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांच्या निवडीबद्दल  शुभेच्छा दिल्या. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धोंडीराम गुंटुरे यांनी सेवानिवृत्तांच्या सेवानिवृत्ती विषयक अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन  दिले .
       अध्यक्ष समारोपातून विठ्ठलराव ताकबिडे यांनी संघटनेच्या कार्यकारणीचे अभिनंदन करून संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व कंधार तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक ,मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी यांनी संघटित होऊन सेवानिवृत्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय कार्य करावे असे आवाहन केले. यावेळी अनेक सेवानिवृत्त हे सेवानिवृत्त संघटनेचे आजीव सभासद झाले.

        या विशेष बैठकीस सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बालाजीराव पवळे, गणेशराव गोंड , सेवानिवृत्त शिक्षक बी. एस. गायकवाड, प्रल्हादराव जाधव इ. बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक ,मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आभार प्रदर्शन चंद्रकांत जोहरे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *