लोकसभा निवडणूकीत केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार फटका बसला आहे. हा पराभव भाजपाच्या पक्ष श्रेष्ठीच्या जिव्हारी लागला असून अहंकार व पक्ष फोडाफोडीचं राजकारण आणि ‘चारसौ पार’चा नारा भारतीय जनता पक्षाला चांगलाच भोवला आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणूकीत ‘चारसौ पारचा नारा दिला आणि दबक्या आवाजात संविधान हटवण्याचा सुर निघाला पण काॅग्रेस पक्षाने माञ संविधान बचावण्याचा पविञा घेतला.हा संविधान बदलाचा मुद्दा भारतीय जनता पक्षाला खोडून काढण्यात अपयश आले आहे. भाजपाने दिलेला ‘चारसौ पारचा नारा हा कांही विशिष्ट समाजाच्या जिव्हारी लागला अन् त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आहे. हे अगदी सत्य आहे.
देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळे या सत्तेची नशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नसा नसात भिनली होती. सत्तेची नशा आणि अहंकार यामुळे आम्ही कांही करु शकतो ही भावना नेत्याच्या मनात निर्माण झाली होती. भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महागाई, बेरोजगारी आणि शेतकर्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्षित केले होते. तर पक्ष फोडाफडीने कळस गाठला होता आणि तिथेच भाजपाचा खरा पराभव झाला,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
भाजपाच्या पराभवाचे मुळ कारण म्हणजे अहंकार आणि पक्ष फोडाफोडीच राजकारण. त्याच बरोबर ‘चारसौ पार’चा नारा होय. लोकसभा निवडणूकीत दिलेला ४०० सौ पार चा नारा, ईडी,सीबीआय आणि दबाव तंञाचा वापर करून दुसर्या राजकीय पक्षातील जनाधार असलेल्या नेत्यांना भाजपात घेणे हे देखील राज्यातील मतदाराला मुळीच आवडलेलं नाही, म्हणून भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात १७ जागेवर आणि देशात २४० जागांवर समाधान मानावे लागले. भाजपा पक्ष श्रेष्ठीनी वेळीच लगाम लावला असता तर देवेंद्र फडणवीस यांना पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करण्यापर्यंत वेळ आली नसती. भाजपाच्या पराभवाला जो अहंकार कारणीभूत ठरला आणि पक्षाचे बारा वाजले तरी आजही नेत्यातील अहंकार कमी झाला नाही. म्हणून आतातरी भारतीय जनता पक्षाने अहंकार बाजुला सारुन राज्यात झालेल्या पराभवाचे चिंतन आणि मनन करण्याची गरज आहे.
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते राज्याचे ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. हा त्यांच्या मनाचा मोठे पणा आहे. कारण जबाबदारी स्वीकारल्या शिवाय पर्याय नव्हता. कारण भारतीय जनता पक्षाचा पराभव विरोधकांमुळे झाला नाही. हे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे. म्हणून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. भाजपाच्या पराभवाला नेत्यातील अहंकार कारणीभूत ठरला तसाच पक्षातील वाचाळ विरांचा स्वभाव यामुळे दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाविषयी जनतेत चिड निर्माण झाली आणि महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण निर्माण झाले हे भाजपाला कळालेच नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यापेक्षा जनतेला अधिक माहित होतं की असली कोण आणि नकली कोण या वाक्याचाही परीणाम निवडणूकीत भाजपाला भोगावा लागला आहे.
भारतीय जनता पक्षाने ‘चारसौ पार चा नारा दिला आणि त्यात दबक्या आवाजात संविधान हटवण्याचा सुर निघाला पण काॅग्रेस पक्षाने संविधान बचावण्याचा पविञा घेतला आणि अनेक पक्ष इंडीया आघाडीत काॅग्रेसने सामिल करुन घेतले पण खर्या संविधानवादी विचाराच्या वंचित बहूजन आघाडीला माञ जाणून बुजून महाविकास आघाडीने सामिल करुन घेतले नाही. त्यांनी पध्दतशिरपणे महाविकास आघाडीत सामिल होण्यापासुन वंचित बहुजन आघाडीला रोखले आहे. कारण त्यांना आंबेडकर घराणे राजकारणात नको आहे, हा आजवरचा इतिहास आहे. राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला आंबेडकर घराण्याविषयी पूर्वी पासून विरोध आहे. कारण खरे संविधान विरोधी पक्ष हेच आहेत. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आता वंचित बहुजन आघाडीने आपला पविञा बदलला पाहिजे कारण महाविकास आघाडीला काॅग्रेस पक्षाला पक्क माहित आहे. की वंचित बहुजन आघाडी ही कधीही भाजपा सोबत जाणार नाही, युती करणार नाही. म्हणून काॅग्रेस पक्षाने वंचितला महाविकास आघाडीत घेतले नाही. तर वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूकीत एकाएकी पाडण्याचा प्रयत्न केला आहे.आणि ते यशस्वी झाले आहेत. सत्तेत सहभागी झाल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. सत्तेत सहभागी झाल्याशिवाय पक्ष वाढत नाही. आता वंचित बहुजन आघाडीने विचार केला पाहिजे आणि युती केली पाहिजे तरच काॅग्रेस पक्षाला धडा मिळेल . वंचित बहुजन आघाडी भाजपा सोबत युती करत नाही आणि काॅग्रेस पक्ष महाविकास आघाडीत घेत नाही. हे समिकरण झाले आहे. आणि त्याचा फायदा काॅग्रेस पक्ष प्रत्येक निवडणूकीत घेत आहे. म्हणून काॅग्रेस पक्षाला धडा शिकवण्यासाठी महायुती सोबत युती केली पाहिजे अशी भावना सामान्य .
जनतेची व सामान्य कार्यकर्त्याची आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता असताना, पक्षाला जनतेचा मोठा जनाधार असताना पक्ष फोडाफोडीचं राजकारण करण्याची भाजपाला गरजच काय होती.
लोकसभा निवडणूकीत निवडून येण्याचा भाजपाला आत्मविश्वास नव्हता का ? ज्या मतदार संघात भाजपाने जागा जिंकली तिथे दुसरा कार्यकर्ता घेण्याची भाजपाला काय गरज होती. तो तेथुन खासदार म्हणून पुन्हा निवडून येणार नाही. अशी भिती भाजपाला वाटत होती का ? महाराष्ट्रात भाजपाकडे सक्षम नेतृृृत्व नाही म्हणून दुसर्या पक्षातील नेत्यांना भाजपाला आयात करावे लागले का हा संशोधनाचा विषय आहे. पण मराठवाड्यात महायुतीचा पराभव झाला त्याचे मुख्य कारण म्हणजे माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांचा भाजपा प्रवेश मतदारांना खटकला आहे. पटलेला नाही. कारण मराठवाड्यातील जनतेने व नांदेड जिल्ह्यातील जनतेने चव्हाण घराण्यावर जिवापाड प्रेम केले होते. चव्हाण घराणे हे गेल्या ४० वर्षापासून सत्तेत सहभागी असताना त्यांनी भाजपात प्रवेश का केला ? की अशोकराव चव्हाण यांना जाणून बुजुन भाजपा पक्षश्रेष्ठीने प्रवेश करण्यास भाग पाडले हा संशोधनाचा विषय असला तरी. अशोकराव चव्हाण यांना भाजपात प्रवेश करण्यास भाग पाडले असा आरोप नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील जनतेतून केला जात आहे. याचा मनात राग धरून मराडवाड्यातील व नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात मतदान केले. हे अगदी सत्य आहे. जर अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला नसता तर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि खा. सुधाकर श्रगारे हे पुन्हा एकदा खासदार झाले असते. हे निर्वीवाद सत्य आहे. महायुतीला मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा परीणाम झाला. हे मान्य करावेच लागेल यात शंका नाही.
भाजपाने दहा वर्षात जे पेरलं तेच उगवलं आहे. देशात ४०० सौ पारचं स्वप्न बघणार्या भाजपाला २४० जागावर समाधान मानावे लागले तर राज्यात ४८ जागांच स्वप्न पाहणार्या भाजपाला १७ जागावर समाधान मानावे लागले हे भारतीय जनता पक्षाला भविष्यात धोक्याची घंटा आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने वेळीच सावध झाले पाहिजे आणि अहंकार भाजूला सारून विकासाच्या मुद्याची कास धरावी लागणार आहे.तरच येणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळू शकते हे अगदी सत्य आहे.
या वेळची लोकसभेची निवडणुक लोकांनीच हाती घेतली होती. त्यामुळे भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण ही निवडणुक महागाईच्या विरोधात होती, ही निवडणूक कंञाटी नोकरभर्तीच्या विरोधात होती, ही निवडणूक पेपरफुटीच्या विरोधात होती. या निवडणूकीत मंदिर आणि मज्जित चा मुद्दा पुढे करुन धर्मार्धर्मात तेढ निर्माण करून निवडणूका जिंकण्याचा कांही राजकीय पक्षाचा डाव होता.पण तो डाव जनतेनी उधळून लावला आहे. जनतेला आता विकास पाहिजे त्यासाठी सर्वच जाती धर्माच्या मुलां मुलींना मोफत शिक्षण दिले पाहिजे, शेतकर्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, मजुराच्या हाताला काम मिळाले पाहिजे. देशात आणि राज्यात मोठ मोठाली उद्योग उभारली पाहिजेत, जनतेचं आरोग्य चांगले राहण्यासाठी तालुका स्तरावर मोठ मोठाली दवाखाने उभारली पाहिजेत तरच देशाचा आणि राज्याचा विकास होईल.यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. जनता आता संविधानाने दिलेले अधिकार सरकारला मागत आहे.
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे कंधार
ता. कंधार जि. नांदेड
मो.९५६१९६३९३९