मागच्या शंभर वर्षांपूर्वी काँग्रेसला ज्या नावाची अलर्जी होती ती आजही तशीच आहे…. भल्या भल्या काँग्रेस नेत्यांच्या पोटात ते नाव ऐकलं की ढवळायला सुरुवात होते…. लोकलज्जेस्तव काही सहन करतात, काहींना सहन होतं नाही ते भडा भडा ओकायला लागतात… असेच काही काल घडले… आंबेडकर नावाची किती अलर्जी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विलास मुत्तेपवार हे केवळ एक मोहरा आहे. त्याला सहन झाले नाही त्याने ओकले. हा केवळ मुत्तेपवाराचा प्रॉब्लेम नाही तर समस्त काँग्रेस जनांचा प्रॉब्लेम आहे. परवा पटोले म्हणाले की “अकोल्याचा पुढचा खासदार काँग्रेसचा असेल..”..
मागच्या पंचवीस वर्षांपासून काँग्रेस तीन नंबरवर असते.. काँग्रेस सत्तेत असताना तीन नंबर वर होती, आता महाराष्ट्रात एकही खासदार नसताना पटोले म्हणतात अकोल्याचा खासदार काँग्रेस चा असेल. असो हे त्यांचे अज्ञान त्यांना लखलाभ पण यावरून काँग्रेस मधील टॉप to बॉटम नेत्यांची मानसिकता लक्षात येते. मुळात काँग्रेसला भाजप सरकार घालवायची इच्छा नाही. त्यामुळे ते वरवर भाजप विरोधाचा देखावा करत आहेत. ज्यांच्याकडे लाखोची फिक्स वोटबँक आहे त्यांची काँग्रेस ला अलर्जी आहे आणि ज्यांना गल्लीत कोणी ओळखत नाही अशा शेम्बड्याना सोबत घेऊन काँग्रेसी मोदींचा मुकाबला करायला निघालेत… त्यातही काही तळ्यात मळ्यात आहेत. अनेकात मोदी शब्द उच्चारण्याचे आवसान नाही, हिम्मत नाही असे रणछोडदास काँग्रेस बरोबर आहेत. ज्या नावाला शहा, मोदी घाबरतात त्या नावाची काँग्रेस ला अलर्जी आहे.
आता भाजपला घालवणे काँग्रेसला शक्य आहे का?
खडगे जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी लगाम मात्र दुसऱ्याच्याच हातात आहे. खडगेची धाव………. गांधी परिवाराच्या आवती भोवती असणारे खरे सूत्रधार आहेत.
मराठा आरक्षणावरून असलेला जन आक्रोश अख्या देशाने पहिला. तमाम राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. कोणी हिम्मत करून आलाच तर ठोकून काढला जात होता. *पण तोच समाज एका नेत्यासाठी मात्र हातात पुष्प घेऊन स्वागतला उभा होता* त्यांना ही समजले की आमच्या प्रश्नाचे उत्तर राजगृहावर आहे. हे काय सुचवते?…..
ज्यांना राजगृहाचे महत्व समजले, त्यांची पावले राजगृहाकडे वळत आहेत. जे अज्ञानी आहेत ते गटातटात गुरफटून पडलेत. राजगृहाचा विरोध केला की काँग्रेस काहीना काही तुकडा फेकते एवढी आस धरून काही बसलेले आहेत….
आता वेळ आलेली आहे. सर्व जनसागर राजगृहाकडे निघालेला असताना आम्ही मागे राहिलो तर आमच्या सारखे कपाळ करंटे आम्हीच ठरू.
मी अनेक वेळा म्हटलं आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ही शेवटची तटबंद आहे. ही तटबंद आहे तोवर आपण सुरक्षित आहोत. बाकी सारे बाजारबुणगे आहेत….
चला राजगृहाशी एकनिष्ठ राहू…….
गणपत गायकवाड नांदेड
9527881901