रीटर्न गिफ्ट..

आमच्या सोसायटीमधलं एक उदाहरण सांगते.. जे सगळीकडे अनुभवायला मिळतं… काही दिवसांपुर्वी मी आमच्या ग्राउंडपाशी कट्ट्यावर बसले होते.. समोरून आई आणि ७/८ वर्षांची मुलगी येउन कट्ट्यावर बसल्या.. त्या मुलीची आई तिला म्हणाली , अगं सोहम ने रिटर्न गिफ्ट काय दिलं ??.. कदाचित सोहम हा तिचा मित्र असावा आणि बहुतेक त्याचा वाढदिवस असावा असा मी अंदाज बांधला.. तिने बॅग उघडून एक पेंसील काढून आईला दाखवली ..आईचे एक्स्प्रेशंस मी न्याहाळत होते.. छान किवा सुंदर असं काहीतरी तिच्याकडून अपेक्षित होतं.. तिने मुलीला पेंसील बॅगेत ठेवायला सांगितली आणि दोघी तिथून निघून गेल्या आणि त्याचक्षणी माझ्या विचारांची दिशा काम करु लागली.. कारण कोवळ्या मनावर आपण जे लिहु तेच त्या बाळाचं भविष्य असतं.. यालाच संस्कार म्हणतात कारण आपण मुलांना द्यायला शिकवतच नाही..

लहानपणापासूनच त्याला कशाच्या ना कशाच्या बदल्यात काहीतरी घ्यायची सवय लावतो आणि इथेच आपण चुकतो.. लहान गोष्टी असतात पण त्या आयुष्यात खुप मोठा रोल प्ले करतात.. आपल्याला माहित आहे पहिला श्वास सोडल्यावरच दूसरा घेता येतो पण ती नैसर्गिक क्रिया आहे आणि इथे आपण ही आणि अशा अनेक सवयी लावतो.. हा दोन्हीमधे खूप मोठा फरक आहे.. घेण्याआधी आपल्याला देता यायला हवं.. मग ते प्रेम असो.. विचार असोत.. किवा कुठल्याही गिफ्टस असोत.. बऱ्याच जणाना सतत घ्यायची सवय असते .. आपल्या फ्रेंड सर्कल मधे सुध्दा पहा.. ज्यांना पार्टी द्यायची असते तीच व्यक्ती स्वतःहुन अनेकदा पार्टी देते आणि अनेकदा खाऊनही एखाद्याला एकदाही काहीही द्यावं वाटत नाही… ही वृत्ती आहे.. आपण काय देतो यापेक्षा न मागता देतो हे खूपच प्रेरणादायी असतं.. या सगळ्याची मुळं ही लहानपणीच रुजतात.. आपल्या पालकांचं मुलं अनुकरण करतात त्यांनी अनुसरण करणं गरजेचे असते..

काही जणाना दुसऱ्याला दिलेलं लिहून ठेवायची किवा लक्षात ठेवुन अनेकदा ते बोलून दाखवायची सवय असते पण खरं तर दिलेलं आपल्याला विसरता यायला हवं आणि कोणाकडून घेतलेलं फक्त लक्षात ठेवता यायला हवं.. पण आपण नेहमी उलट करतो आणि अपेक्षाच्या ओझ्याखाली राहून त्याचं दुख सोसत रहातो.. सुख हवय तर फक्त आणि फक्त द्यायला शिका.. रीटर्न गिफ्ट द्यायला भगवंत बसला आहे.. त्याच्याकडे सत्याला न्याय आहे.. कुठलीही व्यक्ती आपल्याला रीटर्न गिफ्ट देउ शकत नाही कारण श्रीमंत व्यक्ती ( फक्त पैशानेच नाही ) फक्त हे करेन ते करेन म्हणुन झुलवत रहाते आणि ज्याच्याकडे काहीही नाही ती व्यक्ती करोडोचा आनंद देउन जाते .. हे अनुभव तुम्हीही घेतले असतील आणि मीही घेतले आहेत.. अनुभव कितीही आले तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही कारण अंतिम सत्य तेच आहे.. सत्य मेव जयते..
विचारिक बैठक ज्याची मोठी ती व्यक्ती महान आणि तीच शेवटपर्यंत लक्षात रहाते..
#SonalSachinGodbole

#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *